|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडणेची सुप्रसिद्ध पुनव आज ,

पेडणेची सुप्रसिद्ध पुनव आज , 

पेडणे /  (प्रतिनिधी )

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पेडणेची सुप्रसिद्ध पुनव आज रविवार  13 रोजी असून पेडणे शहर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. लाखो भक्तगणांच्या नजरा पेडणेतील दसरा उत्सव व  प्रसिद्ध पुनव  (कोजागिरी ) पौर्णिमेकडे लागलेले असतात. पुनवेसाठी पेडणे शहर सजलेले आहे. सगळीकडे विजेचा लखलखलाट असून, पताका तसेच हिंदू उत्सवाचे भगवे ध्वज लावून सर्वत्र मंगलमय आणि उत्साही वातावरण निर्माण केले आहे. विजेचा लपंडाव होऊ नये यासाठी  वीज खात्याने अतिरिक्त मोबाईल  ट्रान्सफॉर्मर तैनात ठेवला आहे.  कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे . मोक्मयाच्या ठिकाणी आणि गर्दीचा फायदा उठवत पाकीटमारी होऊ नये यावरही पोलीस लक्ष ठेवून असणार आहे .

104 पोलीस 94 ट्रफिक पोलीस

पेडणे पुनवेच्या पोलीस बंदोबस्तासाठी एकूण 104 पोलीस व 94  टॅफिक पोलीस तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर आणि  पेडणे वाहतूक  पोलीस उपनिरीक्षक अशोक बावकर यांनी दिली .

पार्किंग जागा व त्यातील बदल

पेडणे पुनवेसाठी पेडणे ट्रफिक पोलिसांनी वाहनचालकांना आवाहन करताना पार्से मार्गे येणारी पुनवेसाठी वाहनांच्या पार्किंगसाठी भागशिक्षणाधिकारी पेडणे कार्यालयासमोरील मोकळय़ा जागेत वाहने पार्किंग करावीत. कोरगावमार्गे येणारी वाहने सेंट जोजफ हायस्कूल मैदान, पत्रादेवीमार्गे येणारी वाहने व्हायकाऊंट  धारगळ मार्गे येणारी वाहनांनी कदंबा बसस्थानक पार्किंगमध्ये वाहने पार्क करावीत , वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहनचालकांनी उत्सव   आनंदात साजरा करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले .

मुतारीची सोय

भाविकांची गर्दी लक्षात घेवून एकूण मोबाईल पाच बायोटा?यलेट,  मुतारीची सोय केली असून त्याव्यतिरिक्त कदंबा   बसस्थानकावरील  शौचालय कार्यरत राहणार आहे .

वाहतूक कोंडी होवू नये यासाठी जनतेने सहकार्य करावे , कुणीही वाहतूक कोंडी मुद्दाम करू नये , किंवा मधोमध वाहने पार्क करू नये तसे झाल्यास वाहनाला कुलूप ठोकून वेळप्रसंगी वाहन उचलून नेण्याची सोय केली जाईल अशी माहिती टॅफिक पोलीस अधिकारी अशोक बावकर यांनी दिली . 

पेडणे पुनवेसाठी विविध प्रकारची दुकाने थाटलेली आहेत. त्यात वेगवेगळय़ा मिठाया, खाजे , लाडू , कपडे , चप्पल , भांडी , खाण्याचे वेगवेगळे दुकाने , फळा, फुलांची दुकाने थाटलेली आहेत .

आपत्कालीन सेवा कार्यरत

या उत्सवात कोणतीही दुर्घटना घडू नये , यावर अधिकारी लक्ष ठेवून आहेत .  त्याशिवाय आपत्कालीन सेवा कार्यरत आहे .