|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावचा युवक करणार भारताचे प्रतिनिधीत्व

बेळगावचा युवक करणार भारताचे प्रतिनिधीत्व 

बेळगाव  / प्रतिनिधी

बेळगावमध्ये कौशल्य तर आहेच. पण त्याला जर व्यासपीठ मिळाले तर जगामध्ये आपले नाव कोरू शकतात. आझाद गल्ली येथील युवक आपल्या कौशल्याच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. संपूर्ण देशभरातून त्याची एकमेव निवड झाली असून ‘आंतरराष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर इंडोनेशिया येथे तो व्याख्यान देणार आहे. त्यामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात येणार आहे.

आझाद गल्ली येथील व्यंकटेश अमितसिंग राजपूत हा ऐरोनॉटिकल अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. इंडोनेशिया बाली येथे होणाऱया एशिया वर्ल्ड मॉडेल युनायटेड नेशन्सकडून होणाऱया परिषदेसाठी व्यंकटेश याची निवड करण्यात आली आहे. दि. 12 ते 17 नोव्हेंबर ही परिषद होणार आहे. या परिषदेत प्रत्येक देशाचा एक प्रतिनिधी सहभागी होणार असून वेगवेगळय़ा विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या मिलन राजपूत यांचा तो सुपुत्र आहे. भरतेश इंग्रजी मीडियम स्कूलमध्ये त्याचे माध्यमिक शिक्षण झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण आरएलएस कॉलेजला झाले. सध्या तो मंगळूरच्या श्रीनिवास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत आहे. भारतीय छात्र संसदच्या माध्यमातून तो सामाजिक कार्य करत आहे. देशभरातील 800 विद्यार्थ्यांमधून त्याची निवड झाली आहे.

आर्थिक मदतीची गरज

व्यंकटेश हा इंजिनिअरिंग करत सामाजिक कार्यही करतो आहे. भारतीय छात्र संसदच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. आता त्याला इंडोनेशिया येथे जाण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यामुळे बेळगावच्या या युवकाला देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्याचे हात बळकट करणे गरजेचे आहे. इच्छुकांनी 9482418495 या क्रमांकाशी संपर्क साधून आर्थिक मदत करण्याचे आवाहन राजपूत कुटुंबाने केले आहे.

Related posts: