|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » परतीच्या पावसासोबतच धुक्याचेही संकट

परतीच्या पावसासोबतच धुक्याचेही संकट 

निपाणीसह परिसरातील चित्र : तंबाखूसह फळभाजीपाल्याला मारक

वार्ताहर/ निपाणी

अतिवृष्टी, महापूर अशा संकटातून बाहेर पडलेले व स्वतःसह पिकांना सावरणाऱया शेतकऱयांना परतीच्या पावसाने झटका दिला. दोन दिवसात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याचे समाधान व्यक्त होत होते. पण हे समाधान व्यक्त होतयं न होतयं तोच शनिवारी पहाटेपासून सकाळी 8 पर्यंत पडलेल्या धुक्याचे नवे संकट उभे केले. धुक्याच्या माध्यमातून पाऊसच पडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. हे धुके तंबाखू, सोयाबीन पिकांसह फळ व भाजीपाला उत्पादनावर विविध रोगांचा प्रादूर्भाव होण्यास कारण ठरणार असल्याने भीती व्यक्त होत आहे.

शनिवारी सकाळी धुके पाहून शेतकऱयांची चिंता वाढली आहे. कारण काहीवेळा धुके हे पावसाच्या उघडिपीस तर काहीवेळा पावसाला सुरुवात होण्याचे संकेत मानले जातात. यामुळे हे धुके नेमके कशाचे याविषयी चिंता वाढली आहे. सध्या तंबाखू पिकाची वाढ जोमाने होत आहे. खरीप पिकांच्या काढणी व मळणीची कामे गतीने सुरु आहेत. अशा परिस्थितीत परतीचा पाऊस पिकांसाठी धोका ठरला आहे. तोच धुक्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. या धुक्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱयांना रिमझीम पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे. धुक्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तंबाखू पिकावर कडक्या रोगाचा प्रादूर्भाव या धुक्यामुळे होतो. फळ व भाजीपाल्याच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होत आहे. 

Related posts: