|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पाण्यात पाय घसरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

पाण्यात पाय घसरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू 

बेळगाव : प्रतिनिधी

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भात शेताची पूजा करण्यासाठी गेलेल्या निलजी येथील युवकाचा पाण्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पुन्नाप्पा कल्लाप्पा मनुरकर (वय 35) असे या युवकाचे नाव आहे. सकाळी आठ वाजता ही घटना घडली.

पुन्नाप्पा भात शेताची पुजा करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी ते पाय घसरून पाण्यात पडले. पुन्नाप्पा यांना पोहता येत नव्हते. शिवाय अति पावसामुळे या भागात चिखलाने दलदल निर्माण झाली होती. यामुळेच ही घटना घडली आहे.

सात तासाच्या शोध मोहिमेनंतर गावातील काही साहसी तरुणांच्या प्रयत्नाने त्यांचा मृतदेह सापडला. सेंट्रींग कामाबरोबरच शेती हा व्यवसाय सांभाळत पुन्नाप्पा घराचा चरितार्थ चालवत होते.

Related posts: