|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » हॉटेल कामगाराच्या खून प्रकरणी फरारी संशयिताला अटक

हॉटेल कामगाराच्या खून प्रकरणी फरारी संशयिताला अटक 

मार्केट पोलिसांची कारवाई, 14 दिवसांपूर्वी झाला होता खून

प्रतिनिधी/ बेळगाव

वाढदिवसाच्या पार्टीनंतर चुकून पाय लागला म्हणून आपल्याच सहकाऱयाच्या डोक्मयावर बिअर बाटलीने हल्ला करून त्याचा खून केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी रविवारी फरारी तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे.

शशिकुमार रामाप्पा उद्दाप्पगोळ (वय 21) रा. हिडकल डॅम, ता. हुक्केरी असे त्याचे नाव आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी व त्यांच्या सहकाऱयांनी रविवारी शशिकुमारला अटक केली. त्याची चौकशी करून त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

30 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर येथील (आरटीओ सर्कलनजीक) साई लॉजमध्ये विनायक चंद्रकांत रायबागकर ऊर्फ कलाल (वय 28) रा. घटप्रभा या हॉटेल कामगाराचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. लॉजमधील एका खोलीतील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळय़ात विनायकचा मृतदेह आढळून आला होता.

मार्केट पोलिसांनी त्याच दिवशी नवीनचंद्रा शेट्टी (वय 30) रा. शिमोगा याच्याबरोबर एका अल्पवयीन मुलालाही अटक केली होती. खुनाच्या घटनेनंतर शशिकुमार हा फरारी झाला होता. तेव्हापासून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. शशिकुमारच्या वाढदिवसादिवशी लॉजमध्ये हॉटेलमध्ये काम करणाऱया मित्रांनी पार्टी केली होती.

रंगीत पार्टीनंतर चुकून विनायकचा पाय लागल्यामुळे वादावादी होऊन तिघाजणांनी विनायकवर बिअर बाटली व दंडुक्मयाने हल्ला करण्यात आला होता. हल्ला चुकविण्यासाठी विनायक हा खोली क्रमांक 204 मधील स्वच्छतागृहात शिरला. तेथेच त्याचा खून करण्यात आला होता. फरारी संशयिताला रविवारी अटक करण्यात आली आहे.

Related posts: