|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आगोंदमधील ‘त्या’ बांधकांमावर कोणत्याही क्षणी कारवाई

आगोंदमधील ‘त्या’ बांधकांमावर कोणत्याही क्षणी कारवाई 

प्रतिनिधी/ काणकोण

आगोंद पंचायत क्षेत्रामधील किनारट्टीवरील ज्यांची बांधकामे अनधिकृत आहेत अशा व्यावसायिकांचा जीव सध्या टांगणीला लागला असून सीआरझेड कक्षेतील अनधिकृत बांधकामे कोणत्याही क्षणी पाडण्यात येतील अशी माहिती आगोंद पंचायतीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार दोन महिन्यांपूर्वी काही बांधकामे हटविण्यात आली होती. जी बांधकामे अजूनही उभी आहेत त्यांच्यावर आज सोमवारी किंवा मंगळवारी कारवाई करण्याची तयारी काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ठेवली आहे.

उच्च न्यायालयात एका व्यक्तीने अनधिकृत बांधकामांविरुद्ध गुदरलेल्या याचिकेवर देण्यात आलेल्या निवाडय़ास अनुसरून सहापैकी चार बांधकामे हटविण्याचे काम आगोंद पंचायतीने केले आहे. ‘एचटूओ’ची 35 पैकी 17 कुटिरे हटविण्यात आली असून बाकीच्या बांधकामांसदंर्भात न्यायालयाकडून स्थगिती आणली गेल्यामुळे काम बंद ठेवावे लागल्याची माहिती पंचायतीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आगोंद पंचायतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामगिरी केली नसल्याचा दावा करून संपूर्ण प्रकाराचे छायाचित्रण आपण न्यायालयात सादर करणार असल्याचे याचिकादार फर्नांडो फर्नांडिस यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकाराबद्दल आपण समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Related posts: