|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तोरसेतील राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण पुन्हा एकदा वादात

तोरसेतील राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण पुन्हा एकदा वादात 

दिपमाळी पाडण्यास देवस्थान समितीने घेतला आक्षेप

प्रतिनिधी/ मोरजी

अनेक कारणास्तव सुरवाती पासुन वादात असलेले तोरसे गावातील राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम पुन्हा एकदा वादात अडकले असून  नागरीकाना वेळोवेळी दिलेल्या आश्वासनाला सरकार ,व बांधकाम कंपनीने जवळ जवळ हरताळ फासल्याने  भविष्यात  तोरसेतील नागरीकांच्या संतापाचा उदेक  कोणत्याही क्षणी  होण्याची शक्मयता  निर्माण  झाली आहे.

         तोरसे गावातील  महत्वाचेअसलेल्या  रवळनाथ देवस्थानच्या दिपमाळी व तुळशी व्रुंदावन पाडण्याच्या विषयावरुन गावातील नागरीक एकटवले आहेत.त्यांनी कोणत्याही परिस्थीतीत दीपमाळ न पाडू देण्याचा निर्धार केला आहे  नागरीकानी देवस्थान समितीला अनेकदा विचारणा केली  ,देवस्थान समितीनेही हे बांधकाम पाडण्यास कीवा स्थलांतरीत करण्यास सुरवातीपासुनच विरोधच केला आहे परंतु उपमुख्यमंत्री बाबु आजगांवकर यानी अनेकदा मध्यस्थी करून देवस्थानची दिपमाळी व तुळशी व्रुंदावन काही मीटर मागे घेण्यास तयार केले  होते परंतु पाडलेले बामधकाम संपुर्ण पणे बांधकाम कंपनीनेच करुन द्याव् व त्याचा कच्चा प्लानही कंपनीला दिला होता

    त्या नंतर मुख्यमंत्र्यानीही या देवस्थानला प्रत्यक्ष भेट दिली होती ,तेव्हाही या विषयावर चर्चा  होउन नागरीकाना हवे तसे काम करुन देण्याची सुचना मुख्यमंत्र्यानी केली होती व कंपनीनेही ते मान्य केले होते.

   मध्यंतरी पावसाळय़ा काम बंद होते आता पुन्हा सुरु केल्यावर नागरीकानी मंदीराच्या कामा बाबत विचारणा केल्यावर कंपनीने बांधकाम करुन देण्यास नकार दिला    त्या मुळे देवस्थान समिती ने या विषयावर चर्चा करण्या साठी सर्व  नागरीकांची एक खास बैठक गेल्या ड29सप्टेंबर रोज़ी देवस्थान समीतीचे सचीव प्रकाश शेटये  यानी रवळनाथ मंदिरात बोलावली  या बैठकीला गावातील नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित  होते

      देवस्थान समितीचे अध्यक्ष उपेंद्र परब य़ां®³ाा अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देवस्थानचे जे÷ महाजन सुदन शेटय़े यानी देवस्थानचा दिपस्थंभ व तुळशी व्रुंदावन पाडण्यास वा स्थलांतरीत करण्यास विरोध दर्शविणारा ठराव मांडला  हा ठराव मांडताना त्यानी सांगितलेकी.हा दिपस्तभ व तुळशी व्रुंदावन1910साली बांधला होता परंतु त्या पुर्वीही शेकडो वर्षे या दोन्ही वास्तु  जरा छोटय़ा स्वरुपात येथे होत्या यादोन्ही वास्तु देवस्थानच्या वेगवेगऴdया उत्सवात महत्वाच्या आहेत कायद्या नुसार ज्या पुरातन वास्तुचा लोकाना नित्य वापर होत आहे त्या वास्तु सरकारला पाडता येत नाही तरी पण हा राष्ट्रीय प्रकल्प समजुन म्ख्युमंत्री व उपमुख्यमंत्री बाबु आजगावकरांच्या विनंतीला मान देउन आम्ही एक पाउल मागे,आलो व तडजोड करण्यास देवस्थान समीती व महाजन तयार  झाले.परंतु हा विचार जेव्हा आम्ही देवी समोर ठेवला व देवीला प्रसाद लावले तर देवीनेच या गोष्टीला मान्यता दिली नाही .देवीने जर दिपस्थंभ व तुळशीव्रुंदावन  स्थलांतरीत करण्यास कौल दिला नाही तर सर्वानीच या गोष्टीला विरोधच करावा असा ठराव त्यानी मांडला

   बैठकीत या विषयावर साधक बाधक चर्चा करुन सर्व मताने असे ठरविले की कुठल्याही परिस्थीतीत  सरकार ला या दोन्ही गोष्टी पाडण्यास देउ नये त्या साठी अर्ज विनंत्यानी  सरकारने न ऐकल्यास प्रसंगी देवस्थान समितीने न्यायालयात जावे असे ठरविण्या आले

या बैठकीत व्यंकटेश नाईक ,बाळप्रुष्णा परब, उत्तम परब,,मनोहर नाईक,समीर नाईक,महादेव शेटये,अनंत शेटये,अरुण शेटये ,प्रकाश शेटये,गोविंद शेटय़े,वसंत शेटये तुकाराम परब,दामोदर शेटय़े,दशरथ शेटये,गुरुदास शेटये,यशवंत शेटये,सुहास शेटये ,तनय नाईक ,हर्शद नाईक,सोमा शेटय़े श्रीधर परब,देवबा शेटय़े,दाजी शेटये,नकुऴ शेटये,रवी परब ,साबाजी शेटये ,अमर परब,बुधाजी शेटये,विनायक शेटये,दिगंबर परब,वामन शेटये,रामचंद्र परब व दिनेश शेटये यानी आपापले विचार मांडले.प्रत्येकाने आपल्या भाषणातुन दिपस्तंभ व तुऴस स्थलांतरीत करण्यास जोरदार विरोध केला .

Related posts: