|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » युवापिढीला जडतोय ऑनलाईन जुगार व ड्रग्सचा नशा

युवापिढीला जडतोय ऑनलाईन जुगार व ड्रग्सचा नशा 

प्रतिनिधी/ फोंडा

तिस्क उसगांव येथे चालू असलेल्या ऑनलाईन जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर ड्रग्सच्या सेवनामुळे युवापिढी बरबाद होणाऱया मार्गावर आहे. युवापिढी सर्वस्व गमावून बसल्याशिवाय जुगारी माणसांचे प्रताप कुटूंबियांच्या लक्षात येत नसते  तिस्क-उसगांव भागात रोजरासपणे सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्डे व ड्रग्स व्यवसायात गुरफटलेल्या युवापिढीमुळे अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

आपल्याकडे असलेले पैसे दुप्पट करण्यासाठी किंवा हरलेले पैसे परत मिळवावे या आशेने जुगाराची सवय लागलेल्या कित्येकांनी आपल्याच कर्माने आपल्या संसाराची वाट लावून बसले आहेत. बायको व मुलांची पर्वा नसलेल्या व आपल्याच धुंदीत वावरणाऱया या बेजाबदार व्यक्तींना पश्चाताप करण्याची वेळही टळून गेली आहे.

घरातील सामान व बायकोचे दागिने पेले फस्त

जुगाराच्या व्यसनात गुरफटलेल्या काहींनी पैशासाठी घरातील किमती सामान विकले  तर काहींनी कपाटात ठेवलेले बायकोंचे दागिने फस्त केले आहे. जुगारात अंध बनलेल्या अशा व्यक्तींना आपण आपणासाठीच खड्डा खणतो आहे याचे भानही राहिलेले नाही.

जुगारामुळे गमवावी लागली नोकरी

ऑनलाईन जुगारांचे व्यसन जडलेल्या व तिस्क भागात राहणाऱया किमान सहा जणांना कामावर अनियमित जात असल्याने एका बडय़ा कंपनीने कामावरून कमी करण्याच्या घटनानांही समोरे जावे लागले आहे. कायमस्वरूपी नोकरीवरून काढलेले हे कामगार घरातील माणूस आजारी असल्याचे खोटे सांगून लोकांकडून पैसे उचलतात व गेलेले पैसे परत मिळविण्यासाठी परत ऑनलाईन जुगार खेळतात.

दुचाकी, चारचाकी वाहने गहाण ठेवून घेतात कर्ज

फोंडा येथील एक व्यक्ती भरमसाठ व्याज आकारून कर्ज देत आहे. या माणसांकडे तिस्क येथील चारजणांनी दुचाकी तर दोघांनी आपली चारचाकी वाहने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. बरेच महिने झाले तरी हे कर्ज फेडून आपली वाहने सोडवून नेण्याची परिस्थिती या कर्जदारांकडे नाही त्यामुळे ही वाहने स्पॅपमध्ये विकण्याच्या तयारीत सदर व्यक्ती आहे. अट्टल जुगाराबरोबरच युवापिढीही या ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित होत आहे.

तिस्क भाग ड्रग्सच्या विळख्यात

ड्रग्सच्या सेवनामुळे युवापिढी बरबाद होत चालली आहे. पालकांचे दुर्लक्ष झाल्याने काही युवक वाईट मार्गाने वळले आहेत. या युवकांना ड्रग्स कोण पुरवितो हे प्रश्नचिन्ह असले तरी पिळय़े येथे श्री भूमिका देवस्थानाकडे जाणाऱया रस्त्याच्या साकवाकडे, मारूतीगड व बेळगांव बायपास रस्ता येथील कुयणान या ठिकाणी युवकांचे घोळके ड्रग्स सेवन करताना आढळतात. ड्रग्सचे सेवन केलेल्या या युवकांना कसलेच भान नसल्यामुळे धुम स्टाईलने दुचाकी चालवत असतात.

चोऱयांचा प्रमाणात वाढ

तिस्क भागात अधूनमधून चोऱया होत असतात. जुगारांचे व्यसन लागलेले तसेच ड्रग्सच्या विळख्यात सापडलेले युवक पैशाची गरज भागविण्यासाठी चोर करीत असल्याची शक्यता आहे. ऑनलाईन जुगार व ड्रग्सच्या विळख्यात यांचे आणखी गंभीर परिणाम होण्याअगोदर या भागातील सुज्ञ नागरिकांनी थोडासा जागरूकपणा दाखविणे गरजेचे आहे.

Related posts: