|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शितल चांदण्यात पेडणे येथील पुनव उत्सवात

शितल चांदण्यात पेडणे येथील पुनव उत्सवात 

देव भुतनाथ यांचे दर्शन घतले

प्रतिनिधी/ पेडणे

पेडण्याची सुप्रसिद्ध पुनव आणि कोजागरी पौर्णिमेला 13 रोजी शानदार सुरुवात झाली  13 रोजी सकाळपासून भाविकांनी  श्री देवी भगवती , श्री  देव रवळनाथ ,  श्री महादेव व आदिस्थान ज्या ठिकाणी श्री देव रवळनाथ व श्री देव भूतनाथ यांची तरंगे सजवून ठेवली आहे त्या ठिकाणी भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी करून देवदर्शन घेतले .

पुनवेच्या निमित्ताने पूर्ण पेडणे शहर प्रकाशमान झाले होते .  ठिकठीकाणी विविध वस्तूचे  स्टा?ल त्या ठिकाणी बालगोपाळांची खरेदीसाठी उसळलेली गर्दी  , कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठीकाणी पोलीस तसेच  गाडय़ामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी  वाहतूक  पोलीस फेऱया मारताना चित्र दिसत होते .

पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पहारा आणि पोलीस ट्राफिक निरीक्षक अशोक बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्राफिक पोलीस रात्रभर कोणत्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कार्यरत होते . अखंडित वीजपुरवठा करण्यासासाठी पहाटे पर्यंत वीज कर्मचारी,  अधिकारी पेडणे शहरात दिसत होते .

ड़ डॉक्टर काळे यांचे गायन

सुप्रसिद्ध गायक कलाकार पंडित राजा काळे हे गेली 10  वर्षे पुनवे निमित्ताने देवाचा मांगर येथे गायनाची मैफल गाजवत असतात देवीची सेवा करण्यासाठी ते या ठिकाणी नियमित दरवषी  येतात .  आजही पुनवे दिवशी  आयोजित केलेल्या मैफलीत संगीत श्रोत्यांची मने जिंकण्यास ते यशस्वी ठरले . देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्या राजदरबारात त्यांचे वास्तव्य असते . देवस्थान अध्यक्ष जितेंद्र देशप्रभू यांनी माहिती देताना देवाचा मांगर येथे गेली कित्येक वर्षे देशातील विविध भागातील दिग्गज कलाकाराबरोबरच या भूमीतील भूमिपुत्र आपली कला पेश करत असतात . त्यात पंडित राजा काळे हे नियमित गायनाची मैफल रंगवत असतात , 11 रोजी यंदा रघुनंदन पणशीकर यांनी तर आज 13 रोजी राजा काळे यांच्या मैफलीतून पुनवेचा आनंद द्विगुणीत झाल्याचा देवस्थानचे अध्यक्ष   जितेद्र  देशप्रभू  म्हणाले  .

 

Related posts: