|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पार्से येथील देवाची पुनव उत्साहात साजरी

पार्से येथील देवाची पुनव उत्साहात साजरी 

प्रतिनिधी/ मोरजी

दर तीन वर्षांनी साजरा होणाऱया ‘देवाची  पुनव ‘उत्सवात रविवारी पार्से येथील श्री देवीभगवतीने आपल्या तरंगासहित आगरवाडा येथील भाविकांना पारंपारिक पद्धतीने कौल दिल्यानंतर या उत्साहवर्धक उत्सवाची शानदार सांगता झाली .शेकडो भाविकांनी रात्रभर जागून या उत्सवाचा आनंद द्विगुणीत केला .सुवासिनींनी खणा नारळणी ओटय़ा भरून ठिकठिकाणी श्री देवी भगवतीचे दर्शन घेतले पार्से येथून शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास  वाजतगाजत आगरवाडा येथे निघालेली ही तरंगे रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास श्री सातेरी मंदिरात पोचली त्याठिकाणी दिवसभर वास्तव्य केल्यानंतर रविवारी सायंकाळी पार्से येथे माघारी परतली

पार्से येथील श्री भगवती देवी आणि आगरवाडा येथील श्री सातेरी देवी यांच्यात बहिणीचे  संबंध आहेत शेकडो वर्षाची परंपरा आजही टिकून आहे या देवस्थानातील धार्मिक विधीही एक मेकांवर अवलंबून असतात पार्से वासीय आगरवाडा वासियांना ‘आंब्याची होळी’देतात तर आगरवाडा वासीय त्यांना ‘नवे’डपिक कापणी शुभारंभ द़ेतात त्यासाठी एकमेकाची शिमग्याची रोमटे एकमेकाच्या  गावात जाण्याची पद्धत आहे त्याचाच एक भाग म्हणून श्री देवी भगवती दर तिसऱया वषी आपल्या तरंगासहित पाहुणचाराला आगरवाडा येथील श्री सातेरी मंदिरात येते त्यालाच देवाची पुनव असे म्हटले जाते यावषी ही देवाची पुनव शनिवार व रविवार असे दोन दिवस उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त आगरवाडा ापार्से दरम्यानच्या रस्त्यावर ठीक ठिकाणी कमानी उभारल्या होत्या विद्युत रोषणाई करून सडा रांगोळीने रस्ते सजवले होते अश्या उत्साहवर्धक वातावरणात शनिवारी देवी भगवती आपल्या तरागासाहित रात्री 11 वा.सुमारास वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात ,विशिष्ट लयीच्या तालावर नाचत ही तरंगे आगरवाडा येथे आली वाटेत ठिकठिकाणी थांबत देवीने सुवासिनीकडून खणा नारळाच्या ओटय़ा स्वीकारत   भाविकांना  भाविकांना कौल दिला आपल्या पारंपारिक वाटेने येत असताना दरम्यानच्या देवळात थांबून स्वागत स्वीकारत रविवारी पहाटे आगरवाडा येथील सीमेवर देवी भगवतीचे तरांगासाहित आगमन झाले त्याआधीच त्याठिकाणी आगरवाडा वासीय देवी भगवतीच्या आगमनाची प्रतिक्षा करीत थांबले होते त्याठिकाणी पारंपारिक विधी झाल्यानंतर तरंगानी  ढोल ताशांच्या गजरात आगरवाडा गावात प्रवेश केला वाजत गाजत नाचत येणारी ही तरंगे पाहताना सर्वाचे देहभान हरपले अपूर्व असा भा सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती त्यात स्त्री-पुरुष आबाल वृद्धा?चा समावेश होता आगरवाडयात ठिकठिकाणी पंचारतीने ओवाळून तसेच खणा नारळांनी ओटय़ा भरून श्री देवीभगवतीचे दर्शन घेतले ठिकठिकाणी भाविकांना दर्शन देत अखेर रविवारची पहट उजाडली श्री देवी भगवती आपल्या तरागासाहित श्री देवी सातेरीच्या  मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी पारंपारिक विधी झाल्यानंतर देवळात स्थानापन्न झाली त्या ठिकाणी दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले पारंपारिक विधी तसेच महाप्रसाद झाला या ठिकाणी देवी भगवतीच्या महाजनचा तसेच सेवेकार्यांचा आगरवाडातील श्री सातेरी देवास्थांकडून पारंपरिक पद्धतीने बहुमान करण्यात आला यावेळी देवी भगवतीचे सर्व महाजन ,मानकरी मंडळी आवर्जून उपस्थित होती

सायंकाळी श्री सातेरी मंदिराजवळील “कौलाचो कुणगो’’याठिकाणी असलेल्या जागेत सर्व भाविक जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पारंपारिक पद्धतीने कौल देण्यात आला यावेळी भाविकांनी एकच गर्दी केली होती  भाविक भक्तांना कौल झाल्यानंतर श्री देवी भगवती आपल्या तरंगासहित पार्से येथे माघारी परतल्यानंतर दर तीन वर्षांनी साजरा होणाऱया या ‘देवाची पुनव उत्सवाची सांगता झाली

Related posts: