|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेकिनकेरे येथील 55 पोती बटाटय़ांवर डल्ला

बेकिनकेरे येथील 55 पोती बटाटय़ांवर डल्ला 

अस्मानी-सुलतानी संकटाबरोबरच चोरांचाही उच्छाद

प्रतिनिधी/ बेळगाव

बेकिनकेरे येथील शेतवडीत ठेवण्यात आलेले 55 पोती बटाटे चोरण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असून चोरटय़ांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सतत पडणारा पाऊस आणि इतर अनेक समस्यांचा सामना करून मोठय़ा कष्टाने पिकविलेल्या उत्पादनावरही आता चोरटे डल्ला मारू लागल्याने शेतकऱयांवर अस्मानी आणि सुलतानी संकटाबरोबरच चोरीच्या संकटाचाही भर पडली आहे.

गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली आहे. यासंबंधी काकती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता कोणत्याही शेतकऱयाने फिर्याद दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी बटाटे चोरणाऱया चोरांनी मात्र 55 पैकी 19 पिशव्या बटाटे मार्केट यार्ड येथे विकून पाच हजार रुपये घेऊन गेल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

लक्ष्मण बसरीकट्टी, नागोजी आप्पाजी यळ्ळूरकर, मल्लाप्पा सुबराव बिर्जे, लक्ष्मण डिकाप्पा सनदी या शेतकऱयांनी आपल्या शेतात ठेवलेले 55 पोती बटाटे चोरण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून बटाटे चोरीच्या प्रकारामागे स्थानिक गुन्हेगार सक्रिय आहेत की बाहेरचे, याची माहिती मिळविण्याची गरज आहे.

चोरटय़ांनी सुमारे 25 क्विंटल इतके बटाटे चोरले आहेत. सध्या बेळगाव तालुक्मयात बटाटे काढणी सुरू आहे. शेतात ढीग साठवून ठेवण्यात येतो. नंतर ते पोत्यात भरून मार्केट यार्डला पाठविण्यात येतात. शेतात ठेवलेल्या ढिगातून मोठय़ा प्रमाणात बटाटय़ांची चोरी झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरीचे बटाटेही मार्केट यार्डला पाठविण्यात आले. यापैकी एका अडत व्यापाऱयाकडे 19 पोती बटाटे ठेवून आगाऊ रक्कम म्हणून एका महाभागाने पाच हजार रुपये उचलल्याची माहिती मिळाली आहे. जर अडत दुकानात बटाटे आणणारा महाभाग कोण, याचा सीसीटीव्ही फुटेजवरून तपास केल्यास बटाटे चोरणाऱया टोळीचा छडा लावणे शक्मय होणार आहे.

Related posts: