|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Automobiles » बजाज ‘चेतक’ नवीन रुपात दाखल होणार

बजाज ‘चेतक’ नवीन रुपात दाखल होणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध मोटरसायकल उत्पादक कंपनी ‘बजाज’ आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार आहे. या स्कूटरला बजाजच्या सुरुवातीच्या स्कूटरचे नाव ‘चेतक’ देण्यात येणार असल्याचे समजते.

नुकतीच बजाजने घोषणा केली आहे की, 16 ऑक्टोबर रोजी बजाज एका इव्हेंटमध्ये नवीन प्रोडक्टचे लाँचिंग करणार आहे. कंपनीने काय प्रोडक्ट लाँच करणार याबाबत जाहीर केले नसले तरी देखील ही बजाजची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर असणार आहे. याबाबतची ठोस माहिती कंपनीकडून देण्यात आली नाही. बजाजच्या परवा होणाऱया इव्हेंटमधूनच या स्कूटरची माहिती समोर येणार आहे. ही स्कूटर देशात चाचणी दरम्यान अनेकदा पाहायला मिळाली आहे. तिचे व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.

ही स्कूटर इलेक्ट्रिक व्हेईकल अर्बनाइट सब ब्रँडअंतर्गत लाँच होणार आहे. या स्कूटरचं नाव चेतक असू शकते. पहिल्या टप्प्यात पुणे आणि बेंगळूरमध्ये या स्कूटरचे लाँचिंग होणार असून नंतर देशातील अन्य शहरांमध्ये ही स्कूटर दाखल होणार आहे.

बजाज अर्बनाइट स्कूटरमध्ये अधिक सुरक्षित इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम, मोठा डिजीटल इन्स्ट्रूमेंट पॅनेल, रुंद प्रंट ऍप्रन, कर्व्ह साईड पॅनेल आणि मोठय़ा रिअर व्ह्यू मिररसोबत या स्कूटरचा ओव्हरऑल लूक एकदम दमदार असणार आहे.

Related posts: