|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » बांगलादेशी दहशतवादी संघटनेचा धोका

बांगलादेशी दहशतवादी संघटनेचा धोका 

एनआयएचा इशारा :  14 राज्यांत आयएसचे 127 दहशतवादी जेरबंद

  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी बंगालपासून पंजाब तर काश्मीरपासून केरळपर्यंतच्या राज्यांना दहशतवादी कटांबद्दल सतर्क केले आहे. जमात-उल-मुजाहिदीन (जेएमबी) ही दहशतवादी संघटना बांगलादेशी लोकांच्या आडून भारतात हातपाय पसरत आहे. जेएमबीने झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये स्वतःच्या कारवाया सुरू केल्या असल्याची माहिती एनआयएचे महासंचल वाय.सी. मोदी यांनी दहशतवादविरोधी पथकांच्या प्रमुखांच्या बैठकीदरम्यान दिली आहे. 

इस्लामिक स्टेटशी संबंध राखल्याच्या आरोपाप्रकरणी देशात पकडण्यात आलेल्या 127 जणांपैकी बहुतांश जण झाकीर नाईकच्या प्रभावाखाली होते असे एनआयएने म्हटले आहे. तसेच सुरक्षा यंत्रणेने पंजाबमधील पाकिस्तानच्या खलिस्तान विषयक कटाबद्दल सतर्क केले आहे. इस्लामिक स्टेटशी संबंधित एकूण 127 जणांना अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूतून 33, उत्तरप्रदेशातून 19, केरळमधून 17, तेलंगणातून 14 जणांची धरपकड करण्यात आली आहे.

जेएमबीचा मोठा कट उधळला

रोहिंग्या मुस्लिमांची दहशतवादी संघटना असलेल्या जेएमबी नेटवर्कच्या भारतविरोधी कारवायांचा एनआयएने खुलासा केला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये वर्धमान प्रकरणी जेएमबीशी संबंधित पहिला गुन्हा देशात नोंदविण्यात आला होता. जेएमबीचे बांगलादेशातील नेतृत्व 2007 पासूनच भारतात येत असल्याचे तेव्हा उघड झाले होते. एनआयएने जेएमबी नेतृत्वाशी नजीकचे संबंध राखणाऱया 125 संशयितांची यादी संबंधित राज्यांना उपलब्ध केल्याचे एनआयएचे महानिरीक्षक आलोक मित्तल यांनी सांगितले आहे.

 ईशान्येतील दहशतवादी कारवाया

ईशान्य भारतात सक्रीय उग्रवादी संघटनांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शासकीय निधी उग्रवाद्यांना पुरविल्याप्रकरणी काही कर्मचारी आणि अधिकाऱयांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उग्रवादी संघटनांची तळ अन्य देशात आहेत. म्यानमारमध्ये तळ निर्माण करण्यासह प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. 

मिझोरम ट्रान्झिट पॉइंट

मिझोरममध्ये पकडण्यात आलेल्या तीन उग्रवाद्यांच्या चौकशीतून नवी माहिती समोर आली आहे. उग्रवादी मिझोरमचा ट्रान्झिट पाँइंट प्रमाणे वापर करत आहेत. म्यानमारमधून शस्त्रास्त्रांची तस्करी करत बांगलादेशात चकम हिल टॅक्सच्या सशस्त्र गटांपर्यंत ती पोहोचविली जातात. बनावट चलनाप्रकरणी एनआयए ही नोडल संस्था आहे. बनावट चलन रोखण्यासाठी एनआयएने व्यापक पावले उचलली आहेत असे मित्तल म्हणाले.

 

रॉकेट लाँचरची चाचणी

2014 ते 2018 दरम्यान जेएमबीने बेंगळूर येथे 20 ते 20 ठिकाणांचा ताबा घेत दक्षिणत भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न केला. जेएमबीने कृष्णागिरी पर्वतरांगेत रॉकेट लाँचर्सची चाचणीही केली. कर्नाटकातील एका बैठकीत जमाएत-ए-मुजाहिदीनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता असे तपासात समोर आले आहे.

 

Related posts: