|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात वाईन शॉपवर चोरटय़ांचा डल्ला

चिपळुणात वाईन शॉपवर चोरटय़ांचा डल्ला 

1 लाख 73 हजाराची रोख रक्कम लंपास, डीव्हीआर सीसीटीव्ही पॅमेरेही नेले चोरुन

चिपळूण  

सणासुदीच्या धामधुमीची संधी साधत चोरटय़ांनी शहरातील वाईन शॉप फोडून 1 लाख 73 हजाराची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना रविवारी घडली. या रोख रकमेसह डीव्हीआर, सीसीटीव्ही पॅमेरेही चोरटय़ांनी चोरल्याने हे चोरटे सराईत असल्याचे पुढे येत आहे. या घटनेनंतर श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले.

याबाबतची फिर्याद वैभव नथुराम रेडीज यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्य शहरात शिवनदीलगत रेडीज यांचे ओमेगा वाईन मार्ट आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी या वाईन शॉपचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दारुच्या बाटल्याऐवजी या चोरटय़ांनी रोख रक्कमेकडे लक्ष केंद्रीत करत तिजोरीसह रोख रक्कम 1 लाख 73 हजाराचा ऐवज चोरुन नेला. हे चोरटे यावरच थांबले नसून चोरीदरम्यान सीसीटीव्हीत कैद झालेल्या या चोरटय़ांनी डीव्हीआर सीसीटीव्ही पॅमेरेही चोरुन नेले.

नेहमीप्रमाणे रेडीज या वाईन शॉपमध्ये आल्यानंतर त्यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. तत्काळ त्यांनी येथील पोलीस स्थानकात येऊन तक्रार दिली. या घटनेनंतर उपविभागिय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतचा पंचनामा केला आहे. या घटनेनंतर रत्नागिरीहून श्वान व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विलास पडय़ाळ करीत आहेत.

Related posts: