|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » उत्तरप्रदेशात 25 हजार होमगार्ड सेवेतून कमी

उत्तरप्रदेशात 25 हजार होमगार्ड सेवेतून कमी 

 ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने तब्बल 25 हजार होमगार्डस्ला घरचा रस्ता दाखविला आहे. अतिरिक्त महासंचालक पोलीस मुख्यालय, बी. पी. जोगदंड यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

उत्तरप्रदेश सरकारच्या तिजोरीवर होमगार्डच्या वेतनांमुळे मोठा भार पडत असल्याने आर्थिक कारण पुढे करत 25 हजार होमगार्डस्ना सेवेतून कमी केले आहे. कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या होमगार्ड्सना पोलिसांच्या बरोबरीने वेतन देण्यात येत होते. परिणामी, योगी सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत होता. त्यामुळे सरकारने आर्थिक कारण पुढे करत होमर्गार्डस् ला सेवेतून कमी केले.

आतापर्यंत 40 हजार होमगार्डस्ना सेवेतून कमी करण्यात आले असून, त्यांना 25 दिवसांऐवजी 15 दिवसांची डय़ुटी मिळणार आहे. तसेच कायदा व्यवस्थेसाठी डय़ुटी करणाऱया होमगार्ड्सच्या संख्येत 32 टक्के कपात करण्यात आली आहे.

Related posts: