|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » युतीला धक्का : शिवसेनेच्या 36 नगरसेवकांसह 350 पदाधिकाऱयांचे राजीनामे

युतीला धक्का : शिवसेनेच्या 36 नगरसेवकांसह 350 पदाधिकाऱयांचे राजीनामे 

ऑनलाइन टीम / नाशिक : 

शिवसेना आणि भाजपाला राज्यात बंडखोरांचा मोठा फटका बसताना दिसत आहे. नाशिक शहरात महापालिकेतील 36 शिवसेना नगरसेवकांसह 350 पदाधिकाऱयांनी राजीनामे दिले आहेत.

पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांना पाठींबा देणार आहेत. मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याचं सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि 36 नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्यांकडे पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संतोष गायकवाड, दत्तात्रय सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, प्रविण तिदमे, दीपक दातीर, सुदाम डेमसे, भागवत आरोटे, हर्षा बडगुजर, कल्पना पांडे, हर्षदा गायकर, किरण गामने, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, नयन गांगुर्डे, राध बेंडकुळे, रत्नमाला राणे, सीमा निगळ आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी राजीनामा दिला आहे.

नाशिकमध्ये सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. या सभेवर बहिष्कार टाकत शिवसेने भाजपला झटका दिला. तसंच शिवसेनेच्या  नेत्यांकडून येत असलेल्या दबावापुढेही न झुकण्याचा निर्णय शहरातील पदाधिकाऱयांनी घेतला. दुसरीकडे, नाशिक पश्चिम मतदारसंघातील बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क सुरू केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युती संकटात आली आहे. 

 

 

Related posts: