|Monday, February 17, 2020
You are here: Home » विविधा » आझम कॅम्पस मध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा

आझम कॅम्पस मध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा 

पुणे  / प्रतिनिधी :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये माजी राष्ट्रपती डॉ ए पी जेअब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनीसाजरा करण्यात आला. 

संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये मुख्याध्यापक रुमाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रे,शैक्षणिक नियतकालिके आणि पुस्तकांचे वाचन केले.  

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे मंगळवारी 15 ऑकटोबर रोजी वाचन प्रेरणा दिवसनिमित्त पुस्तकांचे आदान प्रदान उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपले आवडते पुस्तक घेवून या पुस्तक मेळ्यामध्ये यावे, दुसरे आवडते पुस्तक वाचावे असा हा आदान प्रदान उपक्रम सकाळी 9. 30 वाजता आयोजितआला.’भिलार’ या पुस्तकांच्या गावाचा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी डॉ कलाम यांची वचने असलेली इ -पोस्टर्स तयार केली.प्राचार्य डॉ शैला बुटवाला,अनिसा खानयांनीस्वागत केले.

 

Related posts: