|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » वाहन, धातू-बँकिंगच्या कामगिरीने तेजी

वाहन, धातू-बँकिंगच्या कामगिरीने तेजी 

सलग तिसऱया सत्रात वधार : निफ्टी 11,428.30 वर बंद

वृत्तसंस्था / मुंबई

मागील आठवडय़ातील शेवटच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात (बीएसई)मधील सेन्सेक्सने तेजी नोंदवली होती. तसेच वातावरण तिसऱया (मंगळवारी) सत्रातही कायम राहिले आहे.   सेन्सेक्सने दिवसअखेर 292 अंकानी तेजी नोंदवली आहे. दिवसभरतील व्यवहारात वाहन, धातू निर्मिती आणि बँकिंग याचे समभाग तेजीत राहिल्याचे पहावयास मिळाले. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्सने 421 अंकाच्या कामगिरीची नोंद केली होती. परंतु बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस 291.62 अंकानी वधारुन निर्देशांक 38,506.09  वर बंद झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई)  मधील निफ्टी दिवसअखेर 87.15 अंकाच्या तेजीसह निर्देशांक 11,428.30 वर बंद झाला आहे.  

दिग्गज कंपन्यांमध्ये वेदान्ता, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, ओएनजीसी, हीरोमोटो कार्प आणि मारुती सुझुकी यांचे समभाग 3.79 टक्क्यांनी वधारले आहेत. दुसरीकडे भारती एअरटेल, इन्फोसिस, टाटा मोटर्स, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग मात्र 2.53 अंकानी घसरणीची नोंद केली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी

आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया, शांघाय, हॉगकॉकमधील बाजारात घसरणीला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीकडे सेऊल आणि टोक्यो या बाजारामध्ये मात्र तेजीची नोंद करण्यता आली. युरोपीय बाजार व्यापारात सकारात्मक वातावरण पहावयास मिळाले आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक जगभरात गाजलेल्या ब्रेग्झीट प्रकारणावर चालू आठवडय़ात योग्य तोडगा निघण्याची शक्यता तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व घटनांचा प्रभाव मुंबई बाजारवर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

सध्या दुसऱया तिमाहीतील नफा कमाईचे आकडेवारी  सादर होत आहे. याचा आधार घेत गुंतवणूकादार गुंतवणुकीचा मार्ग निश्चित करण्याचा अंदाज शेअर बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. त्यामुळे बाजारातील तेजीचा प्रवास कायम राहणार असल्याचे अनुमान अनेक शेअर बाजारातील तज्ञांनी व्यक्त केले आहेत.

Related posts: