|Saturday, January 25, 2020
You are here: Home » क्रिडा » झिंबाब्वे, नेपाळ आयसीसीचे सदस्य

झिंबाब्वे, नेपाळ आयसीसीचे सदस्य 

वृत्तसंस्था/ दुबई

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) झिंबाब्वे आणि नेपाळ यांना आपले सदस्य करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. येथे सोमवारी आयसीसीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता यापुढे झिंबाब्वे आणि नेपाळ हे आयसीसीचे सदस्य म्हणून राहतील. त्याचप्रमाणे महिलांच्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

झिंबाब्वे आणि नेपाळ क्रिकेट संघटनांच्या निवडणुकीवेळी संबंधित देशांच्या सत्ताधारी शासनाचा हस्तक्षेप होत असल्याचे दिसून आल्याने गेल्या जुलैमध्ये आयसीसीने झिंबाब्वे आणि नेपाळ यांचे सदस्यत्व रद्द केले होते. झिंबाब्वे क्रिकेटला आयसीसीकडून यापुढे पूर्ण पाठिंबा राहील अशी ग्वाही आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी दिली आहे. येत्या जानेवारीत होणाऱया आयसीसीच्या पुरूषांच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झिंबाब्वेचा संघ सहभागी होईल.

 

Related posts: