|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात उद्यापासून ‘व्हायब्रंट गोवा’ परिषद

गोव्यात उद्यापासून ‘व्हायब्रंट गोवा’ परिषद 

प्रतिनिधी/ पणजी

हायब्रंट गोवा ही आंतराष्ट्रीय गुंतवणूक उद्योजकता परिषद तसेच प्रदर्शन 2019 (ग्लोबल एक्सो समीट) गोव्यात प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणरा आहे. त्यात सुमारे 2000 देशी तर 500 विदेशी प्रतिनिधी सहभागी होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुखर्जी स्टेडियमवरील परिषदगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत राजकुमार कामत, मनोज पाटील, नितीन कुंकळेकर यांनीही परिषदेविषयी माहिती दिली. व्हायब्रंट गोवा फाऊंडेशनतर्फे ही परिषद भरविण्यात आली असून गेले वर्षभर त्याची तयारी सुरू आहे. या प्रदर्शनात 200 पेक्षा अधिक स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार असून या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य सरकारने 2 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या परिषद, प्रदर्शनामुळे देश विदेशातील आघाडीचे गुंतवणूकदार गोव्यात येणार असून राज्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. त्याचा पाठपुरावा केला जाईल. त्याची फळे वर्षभरातच मिळतील, अनेक उद्योग गोव्यात सुरू होतील, बेकारांना मोठय़ा प्रमाणात नोकऱया प्राप्त होतील, अशी आशा यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

या परिषदेसाठी देशभरात 30 ठिकाणी रोड शो करण्यात आले तसेच 17 देशात त्याची माहिती प्रसारित करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून 52 देशातून प्रतिनिधींची नोंदणी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. गोव्यात व्हायब्रंट गोवा परिषद व्हावी, अशी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची इच्छा होती. ती या निमित्ताने पूर्ण होत असल्याचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. या एकंदरीत कार्यक्रमाचा खर्च 10 कोटीच्या घरात असून सरकारने 2 कोटीचा निधी मंजूर केला आहे. उर्वरीत निधी आयोजकांनी उभा केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्यातील उद्योजकांना तसेच जनतेला ही परिषद म्हणजे एक सुवर्णसंधी असून त्यांनी तशथे आवश्य भेट द्यावी. तेथे प्रवेश मोफत आहे आणि कोणतेही शुल्क आकारले जाणरा नाही. परिषदेत गोव्यातील तालुका पातळीवर विविध क्षेत्रात पुरस्कारही देण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related posts: