|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » Automobiles » होंडा टुव्हिलर्स इंडियामध्ये नवीन रिटेल वित्त भागीदार

होंडा टुव्हिलर्स इंडियामध्ये नवीन रिटेल वित्त भागीदार 

शून्य डाऊन पेमेंट, कमी ईएमआय, आकर्षक व्याजदार

 ऑनलाईन टीम / पुणे : 

ग्राहकांसाठी रिटेल वित्त पुरवठय़ाचे पर्याय विस्तारण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने टाटा कॅपिटल फायनान्सेस सर्व्हिसेस लिमिटेडसारख्या देशातील आघाडीच्या एनबीएफसीबरोबर सामंजस्य करार केला आहे. देशभरात रिटेल वित्त पुरवठा करण्यासाठी ही भागिदारी करण्यात आली आहे.

भागिदारी औपचारिक करण्यासाठी सामंजस्य करारावर सही करण्याच्या कार्यक्रमात होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री आणि विपणन विभागाचे वरि÷ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया, टाटा कॅपिटल फायनान्सेस सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुसल रॉय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, वाहनांची किंमत वाढत असताना दुचाकीचे जास्तीत जास्त ग्राहक त्यांची आवडती दुचाकी खरेदी करण्यासाठी वित्तपुरवठय़ाचे पर्याय पसंत करतात. बीएस-व्हीआय स्थित्यंतर जवळ आल्यामुळे येत्या वर्षात ग्राहकांचा कर्ज घेण्याकडे असलेला कल आणखी वाढेल असे आम्हाला वाटते. यासाठी कंपनीने टाटा कॅपिटल फायनान्सेस सर्व्हिसेस लिमिटेडबरोबर केलेली भागिदारी आमच्यासाठी तसेच ग्राहकांना वित्तपुरवठय़ाचे सोयीस्कर पर्याय करून देणारी फायदेशीर असणार आहे.

शून्य डाउन पेमेंट, कमी ईएमआय योजना, कर्ज परतफेडीची मुदत 36 महिने आदी अतिरिक्त फायदे ग्राहकांना मिळणार आहेत. कमीत कमी कागदपत्रे आणि सरासरी कर्जावर 5 हजार रुपयांच्या अतिरिक्त बचतीसह कर्ज वितरणाचे सोपे आणि जलद पर्याय मिळणार आहेत.

Related posts: