|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » मान्सूनची देशातून ‘एक्झिट’

मान्सूनची देशातून ‘एक्झिट’ 

 ऑनलाईन टीम / पुणे :

नैत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने बुधवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला. यंदा 9 ऑक्टोबर रोजी राजस्थानातून प्रवास सुरू करणाऱया मॉन्सूनने लवकर आपला परतीचा प्रवास पूर्ण केला आहे.

यावर्षी केरळमध्ये 8 जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर महिनाभरात त्याने देश व्यापला. जून महिना अवर्षणाचा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने मात्र पाऊसफुल्ल ठरले. तसेच यंदाचा मान्सूनचा हंगामही दमदार ठरला असून, सरासरीच्या 110 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. दरवर्षी 1 सप्टेंबरच्या आसपास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा तब्बल एक महिना उशिरा म्हणजे 9 ऑक्टोबरला मान्सूनचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर आठवडाभरातच मान्सूनने भारतातला प्रवास संपविला आहे.

 

Related posts: