|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » 370 चा महाराष्ट्राशी संबंध काय ? विचारणाऱयांवर मोदींची टीका

370 चा महाराष्ट्राशी संबंध काय ? विचारणाऱयांवर मोदींची टीका 

ऑनलाइन टीम / अकोला :  

भारतरत्न पुरस्कार नाकारून काँग्रेसने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. त्यांनी वीर सावरकर यांचाही अपमान केला. आणि आता निर्लज्ज विरोधक 370 कलम का हटवले असे विचारात आहेत, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या प्रचार सभेत मोदी बोलत होते. आजही त्यांच्या भाषणाचा मुख्य रोख काश्मीर, 370 कलम हाच होता. त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार टीका केली.

सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणारे देशभक्त असू शकतात का ? असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला आहे. देशहिताच्या मुद्यावर तरी किमान सगळय़ाच राजकीय पक्षांची मतं एक असली पाहिजे आम्ही विरोधकाना विनंती केली, मात्र ही लोक मानायला तयार नाहीत. त्यांचा पक्षात कुणी उरलंय का, जे कुणी असेल ते या वेळी मतदान सुद्धा आम्हाला करणार आहेत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठवाडय़ासाठी अनेक घोषणा झाल्या, मात्र मराठवाडय़ाला काही मिळालं नाही. फक्त काही मूठ भर लोकांनी त्या पैशात स्वतःचा विकास केला. 3 मुख्यमंत्री मराठवाडय़ातून झाले मात्र पायाभूत सुविध सुद्धा मराठवाडय़ाला मिळाल्या नाहीत. या राष्ट्रवादीच्या घडीमध्ये 10-10 वाजले आहेत म्हणजे दोघेजण मिळून केवळ 20 सीट जिंकणार अशी खिल्लीही पंतप्रधानांनी उडवली.

 

 

Related posts: