|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महिलांची ‘पिंकथॉन’ 3 कि.मी.मॅरेथॉन 20 रोजी

महिलांची ‘पिंकथॉन’ 3 कि.मी.मॅरेथॉन 20 रोजी 

कोल्हापूर/प्रतिनिधी

महिलांच्या आरोग्यदायी जीवन व सक्षमीकरणासाठी रविवार दि.20 ऑक्टोबर 2019 रोजी ‘पिंकथॉन’ या 3 कि.मी.मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉनचे यंदाचे दुसरे वर्ष असून ही मॅरेथॉन शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. आजअखेर सुमारे 350 महिलांनी सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती संयोजक सुमित्रा खानविलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना खानविलकर म्हणाल्या यापूर्वी महिला हळदी-कुंकु सारख्या पारंपरिक कार्यक्रमाच्या निमित्ताने घराबाहेर पडत होत्या. बदलत्या युगात महिलाही नोकरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावून घरातील जबाबदारी पार पाडत आहेत. यामुळे महिलांचे आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष होते. त्यांना व्यायामाची आवड लागावी, आरोग्य सदृढ बनावे, शारीरिक, बौधिक व मानसिकदृष्टया सक्षम बनावी आदींसाठी पिंकथॉन उपक्रमाचे सलग दुसऱया वर्षी आयोजन करण्यात आले आहे. असेही यावेळी त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना खानविलकर यांनी पहिल्या वर्षी सुमारे 200 महिलांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या उपक्रमांतर्गत वर्षातून एकदा 20 ऑक्टोबरला जनजागृतीसाठी पिंकथॉन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. तसेच वर्षभर महिन्यातील प्रत्येक शनिवारी शिवाजी विद्यापीठ परिसरात आरोग्य, व्यायाम, योग, सायकलिंग, रनिंग, जलद चालणे आदींविषयी विनामूल्य कार्यशाळा घेण्यात येते. या मॅरेथॉनला कुलगुरू देवानंद शिंदे व ऑक्सिरीचचे संजय घोडावत यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. यावेळी मयुरा शिरवाळकर (पॅन्सर रुग्ण – हाफ आयर्न वुमन), आंतराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत, महाराष्ट्राची 1 ली आयर्न वुमन सुप्रिया निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. असे सांगितले.

दरम्यान, मॅरेथॉनमध्ये महिलांना कुटुंबासह सहभाग नोंदविता येणार आहे. पिंकथॉन मॅरेथॉनला सकाळी 6 वाजता सुरूवात होणार आहे. तरी नोंदणी केलेल्या व सहभागी होऊ इच्छिणाऱया महिलांनी वेळेत शिवाजी विद्यापीठात उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक आरती संघवी, गीता लालवाणी, भाविका दुलानी, मंजिरी हसबनीस यांनी केले आहे. .

देशातील 75 शहरांमध्ये पिंकथॉनमॅरेथॉन

महिला सक्षम तर घर सक्षम या ब्रीद वाक्यनुसार देशाचे पहिले अल्ट्रा मॅन मिलिंद सोमण यांनी प्रथम महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणासाठी ‘पिंकथॉन’ मॅरेथॉनची सुरूवात केली. त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली मॅरेथॉन आता भारतातील सुमारे 75 प्रमुख शहरांमध्ये एकाचवेळी आयोजीत केली जाते. तसेच जागतिक स्तरांवरील 10 प्रमुख शहरांमध्येही पिंकथॉन मॅरेथॉन आयोजीत करण्यात येते. या सर्व शहरातील मॅरेथॉनमध्ये सुमारे 50 हजारपेक्षा अधिक महिला आपल्या कुटुंबासह सहभागी नोंदवितात.

Related posts: