|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » ‘टायटन रागा’ची पेशकश-फॅसेट्स कलेक्शन

‘टायटन रागा’ची पेशकश-फॅसेट्स कलेक्शन 

प्रतिनिधी/ मुंबई

देशभरात सर्वत्र सणासुदीचे वातावरण आहे, या निमित्ताने रागा बाय टायटनने नवीन फॅसेट्स कलेक्शन सादर केले. आधुनिक भारतीय स्त्राr आणि तिच्या व्यक्तित्त्वातील विविध पैलूंपासून प्रेरणा घेऊन हे कलेक्शन डिझाईन करण्यात आले आहे. आधुनिक रचना व सर्वोत्तम कारागिरी यांचा अप्रतिम मिलाप असलेल्या कलेक्शनमध्ये एकूण 12 घडय़ाळे आहेत. स्वरोवस्की क्रिस्टल्स, मदर ऑफ पर्ल, रोज गोल्ड प्लेटिंग आणि डायल व स्ट्रप्सवर विविध भौमितिक आकार यांची आधुनिक सजावट या घडय़ाळांची खासियत आहे.

टायटन रागाचे फॅसेट्स कलेक्शन म्हणजे या ब्रँडच्या अनोख्या स्टाईलला मिळालेली आधुनिकतेची झलक आहे. या कलेक्शनमध्ये तरल आकार व उत्तम प्रतिच्या साहित्याचा मिलाप आहे. आधुनिक स्त्राrचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व या कलेक्शनमधून प्रदर्शित करण्यात आले आहे. आजच्या स्त्राrच्या असीम महत्त्वाकांक्षा दर्शविण्यासाठी या कलेक्शनमध्ये विविध टेक्श्चर ब्लेन्डस वापरले गेले आहेत व रंगांचा कलात्मक वापर करून घडय़ाळाच्या रुपाने कारागिरीचे उत्तम नमुने तयार करण्यात आले आहेत. डीप प्लम, प्रून, रोज गोल्ड व गोल्ड अशा मनमोहक रंगामध्ये ही घडय़ाळे उपलब्ध आहेत. यामध्ये खास डिझाईन करण्यात आलेल्या स्वरोवस्की क्रिस्टल्सचा वापर केलेला असल्याने सणासुदीच्या काळात शानदार ऍक्सेसरीज म्हणून ही घडय़ाळे खूप खुलून दिसतील. फॅसेट्स कलेक्शन बरोबरीने टायटन रागा घडय़ाळ उद्योगात फॉरेस्ट ग्रीन हा नवीन प्लेटिंग रंग सादर करत आहे.

Related posts: