|Saturday, February 29, 2020
You are here: Home » उद्योग » सीईओ सत्या नडेलांना वर्षात 306 कोटीच्या वेतन, भत्याचा लाभ

सीईओ सत्या नडेलांना वर्षात 306 कोटीच्या वेतन, भत्याचा लाभ 

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन :

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) सत्या नडेला यांच्या वेतन, भत्यात एका वर्षात 66 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. 30 जून रोजी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आर्थिक वर्ष(2018-19) या कालावधीत नडेला यांना एकूण 4.29 कोटी डॉलरचा (306.43 कोटी रुपये) नुकसान भरपाई मिळालेली आहे. यामध्ये जास्तित जास्त शेअरच्या स्वरुपात हा लाभ देण्यात येतो. मागील आथिक वर्षात (2017-18) मध्ये 2.58 कोटी डॉलर्स (184.28 कोटी रुपये) इतका लाभ मिळाला होता. अशी माहिती कंपनीने वर्षिक अहवालामधून दिलेली आहे.

कंपनीची व्यापारी उलाढालीचे निश्चित ध्येय साध्य केल्याने आणि कंपनीचे शेअर्सची किमती वाढल्याने कंपनीच्या संचालक मंडळाने नडेला यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई देण्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2014 मध्ये नुकसान भरपाईचा आकडा हा निम्म्यावर होता. तेव्हा नडेला यांना 8.43 कोटी डॉलरचा भता मिळाला होता. यासह सध्या नडेला यांची एकूण नेटवर्थ 2100 कोटी रुपये असल्याचे अनुमान आहे.

नडेलाचे नेतृत्व

नडेला यांच्या नेतृत्वात मागील पाच वर्षात कंपनीचे बाजारी मूल्य 509 अब्ज डॉलरनी नफ्यात राहिले असल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगितले आहे. याच दरम्यान कंपनीचे एकूण शेअरधारकांना मिळणारा परतावा 97 टक्क्यांनी वाढला असल्याचेही नोंदवले आहे. आगामी काळात ग्राहकांचा विश्वास वाढविण्यास मोठा फायदा नडेला यांच्या सक्षम कार्यपद्धतीमधून होणार असल्याचे कंपनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

Related posts: