|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » प्रफुल्ल पटेल आज ईडी कार्यालयात हजेरी लावणार

प्रफुल्ल पटेल आज ईडी कार्यालयात हजेरी लावणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी इकबाल मेनन यांच्या मिर्ची परिवाराची जमीन विकत घेतल्याच्या आरोपाखाली त्यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. आज सकाळी अकरा वाजता प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे.

वरळीतील सीजे हाउसमधील दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहाराबाबत पटेल यांची ईडीच्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड परिसरातील कार्यालयात चौकशी होणार आहे.

ईडीकडून पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेमन याच्या मिर्ची परिवारामध्ये झालेल्या कायदेशीर कंत्राटाची चौकशी सध्या सुरु आहे. इकबाल मेमन यांच्या मिर्ची कंपनीकडून पटेल यांच्या कंपनीला वरळीतील नेहरु तारांगणच्या समोर असलेल्या प्राइम लोकेशनला एक प्लॉट देण्यात आला होता. या प्लॉटवर पटेल यांच्या कंपनीकडून 15 मजल्याची व्यावसायिक आणि रहिवाशी इमारत बनविण्याचे काम सुरु आहे.

ईडीने मागील दोन आठवडय़ापूर्वी टाकलेल्या धाडीमध्ये काही कागदपत्रे आणि पुरावे हाती लागले आहेत. त्यानुसार पटेल यांच्या कंपनीला देण्यात आलेला प्लॉट इकबाल मेमनच्या पत्नी हजरा मेमन यांच्या नावावर होता. हा प्लॉट 200 कोटींचा असून, याबाबतचा अधिक तपास ईडीकडून सध्या सुरु आहे.

Related posts: