|Sunday, November 17, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘नोकिया 110’ फिचर फोन लाँच

‘नोकिया 110’ फिचर फोन लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

प्रसिद्ध मोबाईल कंपनी ‘नोकिया’ने ‘नोकिया 110’ हा फिचर फोन भारतात लाँच केला आहे. या फोनची विक्री नोकियाची वेबसाईट आणि मोबाईल स्टोअर्समध्ये दुकानात सुरू करण्यात आली आहे. या फोनची किंमत 1 हजार 599 रुपये आहे.

या फोनमध्ये 1.77 इंचाचा क्मयूक्मयूव्हीजीए डिस्प्ले तसेच एसपीआरडी 6531 ई प्रोसेसर आणि 5 एमबी रॅम, 4 एमबी स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच यात मायक्रो यूएसबी 2.0 पोर्ट देण्यात आला आहे. फ्लॅशलाईटसह रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये डय़ुअल सीम सपोर्ट आहे. तसेच मेमरी कार्डच्या साहाय्याने एक वेगळे स्लॉट देण्यात आला आहे. या फोनचे वैशिष्टय़ म्हणजे एफएम रेडिओसह काही आकर्षक गेम्स या फोनमध्ये आहेत. 27 तासांपर्यंत या फोनवर ग्राहकांना गाणी ऐकता येणार आहेत.

या फोनमध्ये एफएम रोडिओ सोबत अनेकांचा आवडता सापाचा गेम सुद्धा देण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक, ओशियन ब्लू आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. फोनमध्ये 800 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Related posts: