|Saturday, December 7, 2019
You are here: Home » मनोरंजन » हॉलिवूडपटात चोप्रा सिस्टर्स एकत्र

हॉलिवूडपटात चोप्रा सिस्टर्स एकत्र 

ऑनलाईन टीम / मुंबई :

हॉलिवूडपटात चोप्रा सिस्टर्स प्रथमच एकत्र दिसणार आहे. प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड गाजवत आहे. तर परिणीतीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता या दोघी भगिनी ऑस्कर विजेता ‘फ्रोझन’ या ऍनिमेशनपटाच्या दुसऱया भागात एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे दोघींना बघण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

ऑस्कर विजेता ‘फ्रोझन’ या ऍनिमेशनपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘फ्रोझन 2’ हा लोकप्रिय हॉलिवूडपट भारतीय प्रेक्षकांसाठी हिंदीमध्ये डब केला जाणार आहे. त्यामध्ये या दोन्ही सिस्टर पडद्यावर जरी दिसणार नसल्या तरी देखील दोघींचा आवाज मात्र, या चित्रपटासाठी वापरण्यात येणार आहे. राणी एल्सा आणि राजकुमारी ऍना या दोघी बहिणी ‘फ्रोझन 2’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसतात. यापैकी राणी एल्सासाठी प्रियांका तर राजकुमारी ऍनासाठी परिणीती आवाज देणार आहे.

हा चित्रपट येत्या 22 नोव्हेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे.

Related posts: