|Saturday, February 29, 2020
You are here: Home » leadingnews » ‘ईडी’ला ‘येडी’ करीन : शरद पवार

‘ईडी’ला ‘येडी’ करीन : शरद पवार 

ऑनलाइन टीम / पंढरपूर : 

आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. हे गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधत जे बोलतात त्यांच्यावरच ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही.. तिला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशा शब्दात शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये टोलेबाजी करत भाजप सरकारवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. आज, शुक्रवारी पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या मंचावर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ही उपस्थित होते.

पवार म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत तर कर्नाटकच्या माजी उपमुख्यमत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आह. मला ईडीची भीती मात्र दाखवू नका. मी ईडीलाच येडी करून टाकीन.

पवार म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच देशाचा नव्याने इतिहास लिहिण्याचे वक्तव्य केले. राज्य सरकारने चौथीच्या पाठय़पुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याची माहिती समोर येऊ लागलीय हे गंभीर असून शिवाजी महाराजांसारखा युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांना अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना तो काढण्याचे पाप हे सरकार करीत आहेत, असे ही पवार म्हणाले.

 

Related posts: