|Thursday, November 14, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘असूस’चा डय़ुअल स्क्रीन लॅपटॉप लाँच

‘असूस’चा डय़ुअल स्क्रीन लॅपटॉप लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तैवानची प्रसिद्ध कंपनी आसूसने आपला डय़ुअल स्क्रीन लॅपटॉप भारतात लाँच केला आहे. दोन स्क्रीन असणारा जगातील हा पहिला लॅपटॉप असणार आहे.

zenbook pro duo (UX581) आणि zenbook duo (UX481) अशी या लॅपटॉपची नावे आहेत. झेनबुक प्रो डय़ुओमध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रीन ही सलग आहे. तर, स्क्रीनला की-बोर्ड एवढी जागा देण्यात आली आहे. की बोर्डच्या वरील बाजूस दुसरी स्क्रीन आहे. ज्याच्यामुळे ही दुसरी स्क्रीन पहिल्या स्क्रीनची विस्तारीत स्क्रीन म्हणून दिसते.

या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाची 4k UHD OLED HDR सपोर्टींग स्क्रीन असणार आहे. त्यामुळे कोणताही विंडो दुसऱया स्क्रीनवर ड्रग करता येणार आहे. मुख्य स्क्रीनवर नॅनो एज डिझाईनचा वापर करण्यात आला आहे. तसेच लॅपटॉपमध्ये नंबर पॅड डायल फंक्शनही देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये 32 जीबी डीडीआर फोर रॅम असणार आहे. या लॅपटॉपचे वजन अंदाजे 2.5 किलो आहे. या दोन्ही लॅपटॉपची किंमत अनुक्रमे 2 लाख 9 हजार 990 आणि 89 हजार 990 रुपयांपासून पुढे आहे.

Related posts: