|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » शरद पवारांच्या टीकेवर उदयनराजे म्हणाले…

शरद पवारांच्या टीकेवर उदयनराजे म्हणाले… 

ऑनलाइन टीम / कराड : 

शरद पवारांच्या साताऱयातील भर पावसातील सभेत शरद पवारांनी मागच्या निवडणुकीत उमेदवार निवडताना माझी चूक झाली, मी जाहीर कबूल करतो असं म्हटलं होतं. शरद पवारांकडून झालेल्या अप्रत्यक्ष आरोपाला उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिलं आहे

उदयनराजे कराडच्या सभेत म्हणाले, शरद पवार साहेब आपण आदरणीय होता आणि आहात, युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं, चुकीची भाषा बोलताय तर आमचं एकदा ऐका, चुक तुम्ही नाही आम्ही केली राष्ट्रवादीला मतदान केलं, चार निवडून आले ती चूक आमची आहे का? असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.

ते म्हणाले, भगव्याची आठवण आता आली ही आमची चूक आहे का? सिंचनापासून वंचित ठेवलं ही आमची चुक आहे का? राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटीचा भ्रष्टाचार करणाऱयांना पाठीशी घातले ही आमची चूक होती का? अशा किती तरी चुकांची कबुली तुम्ही कधी देणार, असा सवाल उदयनराजे यांनी पवारांना केला आहे.

 

Related posts: