|Saturday, January 25, 2020
You are here: Home » क्रिडा » कोहलीला विश्रांती देण्याची शक्यता

कोहलीला विश्रांती देण्याची शक्यता 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला बांगलादेश विरूद्ध होणाऱया आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही मालिका 1 नोव्हेंबरपासून भारतात खेळविली जाणार आहे.

गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरपासून विराट कोहली विश्रांती न घेताना सातत्याने आपला सहभाग दर्शविला. त्याने या कालावधीत भारताच्या 56 पैकी 48 सामन्यांत प्रतिनिधीत्व केले. त्याच्यावर कामाचा ताण अधिक होत असल्याने निवड समितीने त्याला काही कालावधीसाठी विश्रांती देण्याचा विचार केला आहे पण कोहलीशी प्रत्यक्षात चर्चा करूनच हा निर्णय घेतला जाईल. बांगलादेश आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड 24 ऑक्टोबरला मुंबईत केली जाणार आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना सुरू आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामना दिल्लीत 3 नोव्हेंबरला, दुसरा टी-20 सामना राजकोटमध्ये 7 नोव्हेंबरला तर तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 10 नोव्हेंबरला नागपूरमध्ये खेळविला जाईल. या मालिकेनंतर उभय संघात विश्वकसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतर्गत दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिली कसोटी इंदोरमध्ये 14 नोव्हेंबरपासून तर दुसरी आणि शेवटची कसोटी कोलकाता येथे 22 नोव्हेंबरपासून सुरू होईल. बांगलादेशच्या या दौऱयानंतर डिसेंबर महिन्यात विंडीजचा संघ भारतात येणार आहे. भारत आणि विंडीज यांच्यात तीन सामन्यांची वनडे तसेच तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.

Related posts: