|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » मनोरंजन » मराठीत विनोदी चित्रपट करायचाय : सिद्धांत कपूर

मराठीत विनोदी चित्रपट करायचाय : सिद्धांत कपूर 

प्रसिद्ध खलनायक आणि क्राईम मास्टर गो गो या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला मराठी चित्रपटात काम करायचं आहे. मात्र, मराठीतील विनोदी कथेवर बेतलेला चित्रपट असावा असे सिद्धांत म्हणतोय. लहानपणापासूनच मी दादा कोंडके यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यांचे सर्व चित्रपट मी पाहिले असून ते मला प्रचंड आवडतात. तसेच त्यांच्या विनोदाचे टायमिंग खूपच परफेक्ट होते. त्यामुळे भविष्यात मला मराठी चित्रपटात काम करायचं आहे, असे सिद्धांत कपूर सांगत होता. ‘यारम’ चित्रपटाच्या निमित्ताने त्याने संवाद साधला.

 तो पुढे म्हणाला की, मी मराठी आहे. माझी आई महाराष्ट्रीयन आणि वडील पंजाबी आहेत. मात्र, घरात वातावरण मराठीच असते. मी, माझी बहीण श्रद्धा कपूर, आई घरात मराठीतूनच एकमेकांशी संवाद साधत असतो. यारम या मैत्रीवरती आधारित असलेल्या चित्रपटात प्रेमाचा चौकोन आपल्याला पाहायला मिळणार आहे. यारम या चित्रपटात सिद्धांत कपूर, प्रतीक बब्बर, प्यार का पंचनामा फेम इशिता राज शर्मा, इशकबाज फेम सुभा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक ओवैस खान यांनी सांगितले की, ही कथा अशी आहे की सिद्धांत कपूरने साकारलेल्या साहिल कुरेशीशी आधीच लग्न केले आहे. या चित्रपटात साहिलने ट्रिपल तलाकद्वारे पत्नी जोयाशी घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर घडणाऱया घडामोडीही या चित्रपटाची मुख्य कहाणी आहे. तिहेरी तलाक कायद्यात नुकत्याच झालेल्या बदलांवरही या चित्रपटात थेट भाष्य केले आहे.

Related posts: