|Monday, January 27, 2020
You are here: Home » मनोरंजन » विठुमाऊली मालिकेत सुरू होणार नामदेव पर्व

विठुमाऊली मालिकेत सुरू होणार नामदेव पर्व 

स्टार प्रवाहवरील विठुमाऊली मालिका गेली 2 वर्ष अविरतपणे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. विठुराया आणि पुंडलिकाच्या भक्तीचा सोहळा अनुभवल्यानंतर आता या मालिकेत नवा अध्याय सुरू होतोय. संत नामदेवांच्या रुपात संतपरंपरेची अखंड गाथा पाहायला मिळणार आहे. खास बात म्हणजे छोटय़ा नामदेवांची भूमिका साकारणार आहे बालकलाकार अमफत गायकवाड. अमफतने लहान वयातच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याआधी छोटय़ा भीवाच्या रुपात प्रेक्षकांनी अमफतला भरभरून प्रेम दिलंय. अमफतच्या अभिनयातला हाच निरागसपणा छोटय़ा नामदेवांच्या रुपातही अनुभवायला मिळणार आहे.

वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत होते. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असं मानलं जातं. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. अशा या थोर संताची गाथा मालिकेतून अनुभवायला मिळणं हा नेत्रदीपक सोहळा असेल. सोमवार ते शनिवार रात्री 7 वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

Related posts: