|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » स्टॉकहोम स्पर्धेत शेपोव्हॅलोव्ह अंतिम फेरीत

स्टॉकहोम स्पर्धेत शेपोव्हॅलोव्ह अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था / स्टॉकहोम

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या स्टॉकहोम खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत  कॅनडाच्या 20 वर्षीय डेनिस शेपोव्हॅलोव्हने एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शेपोव्हॅलोव्हने जपानच्या सुगिताचा 7-5, 6-2 असा पराभव केला.

शेपोव्हॅलोव्हने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत एटीपी टूरवरील स्पर्धेत  पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. दुसऱया उपांत्य लढतीत सर्बियाच्या फिलीप क्रेजोनोव्हिकने स्पेनच्या बुस्टाचा 4-6, 6-3, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. शेपोव्हॅलोव्ह आणि क्रेजोनोव्हिक यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. एटीपी ताज्या मानांकनात शेपोव्हॅलोव्ह 34 व्या तर क्रेजोनोव्हिक 60 व्या स्थानावर आहेत.

Related posts: