|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पावसाचा हाहाकार; निवडणुकीवर सावट

पावसाचा हाहाकार; निवडणुकीवर सावट 

प्रतिनिधी/ सातारा

जिह्यात लोकसभेची पोटनिवडणूक तर विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरता आज सोमवारी 21 रोजी सकाळपासून मतदान होत असून  मतदान केंद्रावर मतदान यंत्रे पोहच करण्यात आली आहेत. रविवारी सकाळी मतदान यंत्रांचे वाटप सकाळपासून करण्यात येत होते. 2 हजार 978 मतदान केंद्रावर यंत्रणा पोहच झाली होती. सकाळपासून मतदान केंद्रावर साहित्य घेवून पोहचण्यासाठी कर्मचाऱयांची गडबड सुरु होती. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणा पोहच होत होती. जिल्हय़ात सुरू असलेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत मतदान कर्मचारी मतदानाचे साहित्य घेवून मतदान केंद्राच्या दिशेने रवानाही झाले आहेत. या पावसामुळे कर्मचाऱयांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी कर्मचाऱयांच्या व अधिकाऱयांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर ईव्हीएम मशिन पोहोचवण्याकरता एसटी बसेस व्यस्त असल्याने एसटीची जिह्यातील सेवा कोलमडली होती. सोमवारीही असाच धुवाँधार पाऊस सुरू राहिल्यास लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱया निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

सातारा जिह्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीकरता आणि आठही विधानसभेकरता 2 हजार 978 ईव्हीएम मशिन्स आणि लागणारे साहित्य पोहचवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले होते. त्या-त्या मतदार संघातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी सकाळपासूनच सूचना दिल्या होत्या. त्यानुसार साहित्य वाटपाचे काम नियोजन केल्या गेलेल्या ठिकाणी सुरु होत्या. साताऱयात शाहू क्रीडा संकुलात सकाळी पावसातही मशिन्स घेण्यासाठी कर्मचाऱयांचे काम सुरु होते. भर पावसातही मतदान केंद्रावर पोहचण्याची लगबग सुरु होती. मतदान केंद्रांवर जाणाऱया कर्मचाऱयांच्या गाडय़ांची रांग पेट्रोल पंपावर लागलेले चित्र दिसत होते. मतदानाचे साहित्य पोहचवण्याकरता जिह्यातील 11 एसटी आगारातील 475 बसेसची सोय केल्याने 70 टक्के बसेस या बंदच ठेवण्यात आल्या होत्या. प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, कांदाटीसारख्या दुर्गम भागात सायंकाळी उशीरापर्यंत मतदानाचे साहित्य पोहचेल असे सांगण्यात आले.

याबाबत उप जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, सर्वच मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे पोहचतील. त्याचे वाटप करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.  

सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 277 मतदान केंद्र तर फलटण आणि माणमध्ये एकूण 701 असे एकूण 2 हजार 978 मतदान केंद्रे आहेत. सातारा लोकसभा मतदार संघात एकूण 9 हजार 31 तर फलटण आणि माणमध्ये 3 हजार 764 दिव्यांग मतदार आहेत. वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण व सातारा विधानसभा मतदारसंघात एकूण 94 हजार 753 तर फलटण आणि माणमध्ये 3 लाख 46 हजार 476 पुरुष  मतदार आहेत. 9 लाख 9 हजार 622 तर फलटण आणि माण मतदारसंघात 3 लाख 25 हजार 419 स्त्राr मतदार आहेत.

   सातारा लोकसभा मतदार संघात 9 हजार 923 तर फलटण आणि माण तालुक्यात 2 हजार 735 सर्व्हिस वोटर आहेत. वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर पाटण आणि सातारा मतदारसंघात एकूण 18 तर माण आणि फलटमध्ये 1 तृतीयपंथी मतदार आहे. 45-सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 मतदारसंघ येतात. या मतदारसंघात एकूण 18 लाख 60 हजार 316 तर फलटण आणि माणमध्ये 6 लाख 74 हजार 631 अस असून आठ मतदारसंघात एकूण 25 लाख 34 हजार 947 मतदार आहेत. जिह्यात 8 ठिकाणी सखी मतदान केंद्र आहेत. तसेच मतदान प्रक्रियेसाठी 13 हजार 809 तर 8 हजार 312 स्त्राr असे एकूण 22 हजार 122 अधिकारी, कर्मचारी मतदानासाठी कार्यरत असणार आहेत.

मतदानांपासूनही वंचित अन् उपाशीही

शासकीय कर्मचाऱयांना मतदान करण्याकरता पोस्टल मतदान आहे. सातारा जिल्हा पोलीस दलात काही कर्मचारी हे बाहेरच्या जिह्यातील आहेत. त्यांना पोस्टल मतदानाची नेंद केली होती. त्या मतदानाची पावतीही मतदारापर्यंत रविवारी दुपारपर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे अनेक कर्मचारी इच्छा असून मतदान करु शकले नाहीत. तसेच ज्या कर्मचाऱयांची नियुक्ती केली होती. त्या कर्मचाऱयांना साहित्य घेण्यामध्ये व नियेजन करण्यामध्ये वेळ गेला. त्यांना प्रशासनाकडून दुपारी 3 वाजेपर्यंत नाष्टा, जेवणही दिले नसल्याचे काही कर्मचाऱयांनी सांगितले.

एसटीची व्यवस्था कोलमडली

  एसटी महामंडळांकडून निवडणुकीच्या कामाकरता एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. सातारा जिह्यातील 475 एसटी बसेसची सोय ईव्हीएम मशिन पोहचवण्याकरता केली आहे. त्यामुळे जिह्यातील ग्रामीण भागात एसटीच्या फेऱया रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एसटीबाबत तीव्र नाराजी प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली.

Related posts: