|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात सव्वा दोन लाखाचा गुटखा जप्त

साताऱयात सव्वा दोन लाखाचा गुटखा जप्त 

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील भरवस्तीत असलेल्या जयहिंद किराणा स्टोअर्स येथे छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 लाख 19 हजार 830 रुपयांचा गुटखा जप्त करत सद्दाम नौशाद मोदी रा. नकाशापुरा, शनिवार पेठ, सातारा याला अटक केली असून या कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकास कारवाईच्या सूचना दिल्या.

तपास पथकाने शनिवारपेठ, नकाशपुरा येथे रोडच्या कडेला असलेले जयहिंद किराणा स्टोअर्स येथे छापा टाकला असता तिथे 2 लाख 19 हजार 830 रुपये किंमतीचा विमल, आर. एम. डी., हिरा कंपनीचा गुटखा आढळून आला. पथकाने तिथे गुटखा विक्री करत असलेल्या सद्दाम नौशाद मोदी याला अटक करुन पुढील कारवाईसाठी त्याला अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे.

 या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपड, पोलीस नाईक शरद बेबले, प्रविण फडतरे,म् ाgनिर मुल्ला, प्रमोद सावंत, विशाल पयार व चालक संजय  जाधव यांनी सहभाग घेतला.

 

Related posts: