|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सप्तसुरांच्या सरींनी श्रोते झाले चिंबचिंब.

सप्तसुरांच्या सरींनी श्रोते झाले चिंबचिंब. 

वार्ताहर / औंध

येथील श्रीमूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कलामंदीरात आज सकाळच्या प्रसन्न वातावरणात ताल सुरांची गट्टी जमली. 79 व्या संगीत महोत्सवास दिमाखात सुरू झाली. धो-धो पडणाऱया वरुणराजाच्या साथीने कलामंदीरात सप्तसुरांची बरसात झाली. गेली कित्येक महिने या मैफिलीची चातकासारखी वाट पाहाणारे अनेक रसिक या सप्तसुरांत भिजून चिंब चिंब झाले.

 देशाच्या ग्रामीण भागातील शास्त्राrय संगीताचे एकमेव  व्यासपीठ  असणाऱया  79 व्या औंध संगीत महोत्सवास शनिवारी सकाळी मोठय़ा दिमाखात, जलधारांच्या साक्षीने मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळयास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी माजी सभापती संदिप मांडवे, उपसरपंच दीपक नलवडे, पंडीत अरुण कशाळकर, अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, प्रदिप कणसेव विविध मान्यवर उपस्थित होते.

 मागील 78 वर्षे  औंधसारख्या ग्रामीण भागात सुरू असलेला हा संगीत महोत्सव आजही अव्याहतपणे सुरू आहे. यावेळी पहिल्या सत्राची सुरूवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी यांच्या नाती श्रीमती अपूर्वा गोखले व श्रीमती पल्लवी जोशी यांच्या सहगायनाने करण्यात आली. त्यांनी सुरूवातीला बैरागी भैरव हा राग गायला. यामध्ये तिलवाडा तालातील  ‘पपीहा भयो’हा बडा ख्याल तसेच काटे कर तू साधन ही तीन तालातील मध्यलय बंदिश आणि त्यानंतर एक तालातील तराणा गायला.

 मियाँ की तोडीमध्ये पं. अरुण कशाळकर यांची गुनन गाऊ तुमरो ही मध्यलयीतील बंदिश सादर केली. त्यानंतर फारुख लतीफ यांनी सारंगी वादन केले. यावेळी राग बसंत मुखारी ताल ‘विलंबित एकताल’ पेश केला तसेच राग दादरा सादर केला. पहिल्या सत्राची सांगता श्रीमती अलकाताई मारुलकर यांच्या गायनाने यावेळी त्यांनी राग गुजरी तोडी त्यामध्ये तिनताल तालातली  ‘सुगर बनरी हा’बडा ख्याल  तसेच’ मैं जानत तोहे’ ही तीन तालातील मध्यलय बंदिश पेश केली. राग देसीमध्ये झपतालातील बंदिश व चैती सादर केली. यावेळी तबला साथ अनुक्रमे  प्रवीण करकरे, संवादिनी साथ सिद्धेश बिचोलकर, तबला साथ स्वप्नील भिसे यांनी केली.   

  संगीत महोत्सव शुभारंभप्रसंगी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले, ग्रामीण भागातील कलावंत, गायकांना तसेच नव्या पिढीला शास्त्राrय संगीताचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून  जोशी घराण्याने सुरू ठेवलेला हा संगीत महोत्सवाचा यज्ञ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असून शासकीय स्तरावरून ही या महोत्सवासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे

Related posts: