|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दिकरपाली येथे दोन बसगाडय़ामध्ये अपघात

दिकरपाली येथे दोन बसगाडय़ामध्ये अपघात 

प्रतिनिधी/ मडगाव

केपे ते मडगाव दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱया दोन बसगाडय़ामध्ये काल सकाळी प्रवासी मिळविण्यासाठी चुरस लागली होती. त्यात दोन्ही बसगाडय़ा या भरधाव वेगात होत्या. दिकरपाली-दवर्ली येथे लकाकी जवळ पुढे जाणाऱया बसने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱया बसने पुढच्या बसला मागून जोरदार धडक दिली. त्यात दहा प्रवासी जखमी झाले तर याच अपघातात एका स्कुटरने बसला धडक दिल्याने स्कुटरवरील दोघे जण जखमी झाले.

जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना किरकोळ मार लागला होता. त्यांना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून डिसचार्ज देण्यात आला. या अपघाताची मायणा-कुडतरी पोलिसांनी गंभीर दखल घेताना, पाठीमागून धडक देणाऱया बस चालकाचा ड्रायव्हिंग परवाना तसेच बसचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अपघातात ज्योनिता मास्कारेन्हास (52,काकोडा), मनिषा च्यारी (40, केपे), पद्मा नंदीका (52, मळकर्णे), बसवराज चव्हाण (20, सावर्डे), ज्हाकारली नंदीका (65, मळकर्णे), कमल गोपाळ, भुवनेश्वर गोयल, लालचंद लेकी, शंकर लीम, हे प्रवासी तर स्कुटर चालक शेख अहमद व पाठीमागे बसलेला कबीर काळे हे जखमी झाले. एका प्रवाशाला खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याचे नाव उपलब्ध होऊ शकले नाहीत. मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण माजिक हे पोलीस निरीक्षक गुरूदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत. 

बस क्रमांक जीए 09 यू 5803 ही पुढे धावणारी बस तेजस नाईक हा चालवित होता तर पाठीमागून धावणारी बस क्रमांक जीए 09 यू 5758 ही ऍथनी रिबेलो हा चालवित होता. या बसचा परवाना रद्द करण्याबरोबर चालकाचा परवाना रद्द करण्याची शिफारस गेली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related posts: