|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » चंद्रकांत पाटलांकडून प्रतिस्पर्ध्याला भाजपची ऑफर

चंद्रकांत पाटलांकडून प्रतिस्पर्ध्याला भाजपची ऑफर 

 ऑनलाईन टीम / पुणे :

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकात पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ऍड. किशोर शिंदे यांना आज मतदान केंद्रावरच भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे.

मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता ही ऑफर धुडकावून लावली आहे. त्यामुळे पुण्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या 288 जागांसाठी आज मतदान होत आहे. अनेक दिग्गज नेते आणि सेलिब्रिटींनी आज मतदान केले आहे. कोथरूड विधानसभेचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनीही आज मयूर कॉलनीमधील जोग शाळेतील मतदान केंद्राला भेट दिली. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ऍड. किशोर शिंदे तिथे होते. त्यावेळी दोघांमध्ये काहीशी चर्चा झाली. त्यावेळी पाटील यांनी शिंदेंना भाजप प्रवेशाची ऑफर दिली.

शिंदे यांनी तात्काळ ही ऑफर धुडकावून लावली. मेधा कुलकर्णी व मुरली मोहोळ यांच्याकडे लक्ष देण्याच्या सूचना शिंदे यांनी पाटलांना केल्या.

Related posts: