|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापूर : उचगावात तरुणाच्या दोन गटात हाणामारी

कोल्हापूर : उचगावात तरुणाच्या दोन गटात हाणामारी 

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उचगाव गावामध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थकांच्यात आणि विरोधी कॉग्रेस (आय)च्या उमेदवारांच्या समर्थकांत हाणामारी झाली. या प्रकाराने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

किरकोळ कारणावरुन दोन गटात ही हाणामारी झाली. ही घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दोन्ही समर्थकांना वेळीच पोलिसी खाक्या दाखवत या वादावर पडदा पाडला. त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.

Related posts: