|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हुबळी येथील स्फोटानंतर बेळगावात अलर्ट

हुबळी येथील स्फोटानंतर बेळगावात अलर्ट 

प्रतिनिधी/ बेळगाव

हुबळी रेल्वे स्थानकावर सोमवारी झालेल्या स्फोटानंतर बेळगाव रेल्वे स्थानकावरही खबरदारी घेण्यात आली आहे. तब्बल दोन वेळा श्वान पथक व स्फोटकतज्ञांनी रेल्वेस्थानकात कसून तपासणी केली.

विजयवाडा-हुबळी-अमरावती एक्स्प्रेसमध्ये आढळून आलेल्या संशयास्पद बॉक्सचा स्फोट होवून एक तरुण जखमी झाल्याची घटना घडताच बेळगावसह संपूर्ण राज्यातील रेल्वे स्थानकामध्ये खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली. रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱयांनी तातडीने तपासणी मोहीम हाती घेतली.

श्वान पथक व स्फोटकज्तज्ञांनी रेल्वेस्थानक परिसर पिंजून काढला. प्रवाशांच्या बॅगा, पार्सल विभागातील पार्सल किंवा संशयास्पदरित्या आढळणारी प्रत्येक वस्तू तपासण्यात आली. या संबंधी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता हुबळी येथील घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केवळ रेल्वे स्थानकच नव्हे तर रेल्वे स्थानकावर येणाऱया प्रत्येक रेल्वेच्या डब्याचीही पोलिसांनी तपासणी केली. मात्र कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Related posts: