|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खासबाग येथील घरफोडीत 30 ग्रॅमचे दागिने पळविले

खासबाग येथील घरफोडीत 30 ग्रॅमचे दागिने पळविले 

प्रतिनिधी/ बेळगाव

बंद घराचा कडीकोयंडा तोडून दागिने लांबविण्यात आले आहेत. राघवेंद्र कॉलनी खासबाग येथे रविवारी ही घटना उघडकीस आली असून या संबंधी सोमवारी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चोरटय़ांनी 30 ग्रॅमचे दागिने पळविल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संबंधी संतोष तिम्माप्पा शेट यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. रविवारी संतोष व त्यांचे कुटुंबिय कारवार जिह्यातून बेळगावला आल्यानंतर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

संतोष हा सुवर्ण कारागिर आहे. तो व त्याचे कुटुंबिय कारवार जिह्यातील तोडुरु या गावी गेले होते. 17 ऑक्टोबर रोजी ते धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आपल्या गावी गेले होते. रविवारी चोरी झाल्याचे उघडकीस येताच ते बेळगावला परतले. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related posts: