|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस हुतात्म्यांना अभिवादन 

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील सशस्त्र दलाच्या मैदानावर सोमवारी पोलीस हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. वरि÷ पोलीस अधिकाऱयांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले.

बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एच. जी. राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोधा वंटगोडी आदींसह जिल्हा व शहरातील पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कर्तव्यावर असतानाच कित्तूर येथील पोलीस उपनिरीक्षक विराप्पा ताताप्पा लट्टी यांचे निधन झाले. विराप्पा यांच्यासह राज्यातील 12 पोलीस व अधिकारी हुतात्मा झाले आहेत. यावषी देशभरातील 292 पोलिसांनी हौतात्म्य पत्करले आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था राखताना जीवाची परवा न करता सेवा बजावलेल्या या हुतात्म्यांच्या सेवेचे स्मरण करण्यात आले. यावेळी गोळीबाराच्या फैऱया झाडून त्यांना सलामी देण्यात आली.

Related posts: