|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी भागात तंबाखूला फटका

निपाणी भागात तंबाखूला फटका 

वार्ताहर/ निपाणी

निपाणी शहरासह परिसरातील ग्रामीण भागात ढगफुटीसदृश परतीच्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून हाहाकार माजविला आहे. या परतीच्या पावसामुळे नागरिकांना रोजची सायंकाळ नकोशी झाली असून चिंता व्यक्त होत आहे. रोजच्या या परतीच्या पावसाच्या तडाख्याने तंबाखू पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे.

ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी परिसरात महापुराला कारण ठरली. या महापुरामुळे खरीप पिकांसह ऊस पिकाचे नुकसान होताना शेतकऱयांचे कंबरडेच मोडले. यातून सावरणाऱया शेतकऱयांनी वाचलेल्या खरीप पिकांची सध्या काढणी व मळणी सुरू केली होती. तंबाखू पिकाची वाढही चांगली होत असतानाच परतीच्या पावसाला सुरुवात झाली. ढगफुटी झाल्याप्रमाणे होणाऱया या परतीच्या पावसाने शिल्लक राहिलेल्या खरीप पिकांसह तंबाखू पिकाचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे तोंडचा घास काढून घेण्याची अवस्था निर्माण झाली आहे. श्रीपेवाडी, जत्राट, नांगनूर, यमगर्णी, बुदिहाळ, कोडणी, लखनापूर, पडलिहाळ भागात रविवारी ढगफुटी झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या अर्धातासात पावसाने पिकांचे नुकसान केले. अनेक ठिकाणी शिवारातील तंबाखू पीक वाहून गेले. नांगनूर येथे तर जनावरांना चारा आणण्यासाठी गेल्या शेतकऱयांची दुचाकी वेदगंगेत वाहून गेली. श्रीपेवाडी येथे ग्रा. पं. कडून पाणीपुरवठा होणारा ट्रान्स्फॉर्मर कोसळला. येथील शेतकऱयाचेही मोठे नुकसान झाले. यामुळे या ढगफुटीतील नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Related posts: