|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मलप्रभा नदीला पुन्हा पूर

मलप्रभा नदीला पुन्हा पूर 

रामदुर्ग :

 तालुक्मयातील 29 खेडी व शहरामधील 9 वॉर्डमधील नागरिक दोन महिन्यापूर्वी आलेल्या महापुराने सावरत असतानाच पुन्हा मलप्रभेस पूर आला आहे. त्यातच रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने अनेक घरांची पडझड, येथील तुरनूर प्रेरणा शाळेला पाण्याने वेढा घातला, 10 मेंढय़ा आणि 6 जनावरांनाचाही पावसाने बळी घेतला. तसेच येथील बागायत विभागीय कार्यालयात पाणी शिरून महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, युपीएस आदी अनेक वस्तूंचे नुकसान झाले. तालुक्मयात सुन्नाळनजीक कंकणवाडी व हालोळ्ळी या रामदुर्ग-बेळगाव मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.

रविवारी दुपारी तासभर जोरदार पाऊस शहर परिसरात झाला तर रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत जोरदार पावसाने तालुका परिसरात हजेरी लावली. रामदुर्ग येथे 149 मि. मी., कटकोळ येथे 184.8 मि. मी., के. चंदरगी येथे 76.04 मि. मी., हुलकुंद 68 मि. मी. तर मुदकवी येथे 58.04 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

 तालुक्मयातील चिंचनूर, हुलकुंद, हिरेकोप्प, के. एस. सालहळ्ळी, लखनायनकोप्प व शहर परिसरामध्ये पावसाने काही घरांची पडझड झाली आहे. यातच दहा मेंढय़ा व सहा जनावरे पावसामुळे बळी गेली आहेत. मलप्रभा नदीस रेणुका जलाशयामधून 35 हजार क्मयुसेक्स पाणी सोडण्यात आल्यामुळे सकाळपासून शहर व परिसरातील नदीकाठावरील नागरिक आपल्या कुटुंबासमवेत सुरक्षितस्थळी संसारोपयोगी सामान घेऊन जात असल्याचे दिसून आले. सुरेबान येथे एपीएमसी आवारामध्ये व रेवडीकोप्प येथे निवारा केंद्र सुरू केले असून गरज पडल्यास शहरामध्ये विठ्ठल पेठमधील शाळा व विद्याचेमन शाळेत निवारा केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

 

Related posts: