|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मद्यविक्री पूर्णपणे बंद करावी शेतकरी संघटनेची मागणी

मद्यविक्री पूर्णपणे बंद करावी शेतकरी संघटनेची मागणी 

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यामध्ये मद्यविक्रीमुळे शेतकरी समाज भरकटत चालला आहे. दिवसभर शेतामध्ये कष्ट केल्यानंतर त्याला निवांत विश्रांती मिळावी यासाठी मद्याच्या आहारी अनेक जण जात आहेत. तरुण पिढीही भरकटत चालली आहे. तेंव्हा राज्यातील द्य विक्री पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी भारतीय कृषक समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कर्नाटक राज्य शेती उत्पादनात नेहमीच अग्रेसर असते. सर्वसंपन्न असे हे राज्य आहे. मात्र गेल्याकाही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसत आहे. यामुळे मद्य व्यसनाच्या आहारी शेतकरी जात आहे. तेंव्हा राज्यात संपूर्ण मद्यविक्रीच बंद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. याचबरोबर आता केंद्र सरकार पुन्हा जागतिक खुले धोरण अवलंबण्याचा प्रयत्न करत आहे. ते तातडीने थांबवावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

कित्तूर उत्सवाला मुख्यमंत्री उद्घाटनाला यावेत. याचबरोबर कित्तूर कर्नाटक उत्सव म्हणूनही या उत्सवाला प्राधान्य द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. बेळगाव विभागाला कित्तूर कर्नाटकच असे नाव द्यावे, अशी मागणी देखील करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धाप्पा मोदगी, शिवाजी कागणीकर, ऍड. नामदेव मोरे, लक्ष्मण पाटील, शानूर राजप्पण्णावर, ए. टी. बेळगावकर, राहुल पाटील, वैशाली कम्मार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..

Related posts: