|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पाणी भरलेल्या खड्डय़ात बुडून मुलीचा मृत्यू

पाणी भरलेल्या खड्डय़ात बुडून मुलीचा मृत्यू 

खानापूर / वार्ताहर

 दोड्डहोसूर (ता. खानापूर) गावापासून काही अंतरावर यडोगा मार्गावरील माळरानावर शाडू काढण्यासाठी खणण्यात आलेल्या खड्डय़ात पाय घसरून धनगराची मुलगी बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली आहे.  तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

 सावाक्का इट्टाप्पा हेगडे (वय 9) असे तिचे नाव आहे. याबाबत हकीकत की, अंकोला भागातील काही धनगर यडोगा माळावर दोड्डहोसूर गावाच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून रहात आहेत. सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास धनगरांच्या काही महिला रस्त्यापासून अवघ्या 100 फूट अंतरावर  असलेल्या खड्डय़ाकडे गेल्या होत्या. त्यावेळी सावाक्का ही मुलगी देखील आपल्या आईसमवेत कपडे धुण्यासाठी गेली होते. पण तिचा अचानकपणे तोल गेल्याने ती पाण्यात बुडाली. या घटनेबाबत खानापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. नंतर खानापूर अग्निशमन दलाला पाचारण करून शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर खानापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related posts: