|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महामार्गावर दुहेरी अपघातात दोघे जखमी

महामार्गावर दुहेरी अपघातात दोघे जखमी 

प्रतिनिधी/ निपाणी

निपाणीत महामार्गावर दुहेरी अपघातात दोघे जखमी झाले. यात सुमारे सात लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना हॉटेल गोल्ड लिफनजीक महामार्गावर रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली. या अपघातात बॅटन वाहतूक करणारा ट्रक उलटला. तर थोडय़ाच वेळात एका मालवाहू ट्रकने दुसऱया ट्रकला मागून धडक दिली.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, ट्रक क्र. (एमएच 12 एनएक्स 9798) हा बॅटनपट्टी भरून बेंगळूरहून मुंबईच्या दिशेने चालला होता. हॉटेल गोल्डलिफनजीक आल्यानंतर ट्रक चालक मनोहर बोरगे (वय 36 रा. पुणे) याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक महामार्ग लगतच उलटला. मनोहर याला याला गांधी हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. ट्रकमधील सर्व बॅटन रस्त्यावर पडले. तर यामध्ये ट्रकचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले.

या अपघातानंतर थोडय़ाच वेळात ट्रक क्र. (केए 22 डी 2039) व (एमएच 43 वाय 6907) हे दोन्हीही ट्रक बेंगळूरहून मुंबईच्या दिशेने जात होते. पुढील ट्रकने ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱया ट्रकने समोरील ट्रकला जोराची धडक दिली. त्यात मागील ट्रकचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. या अपघातात ट्रक चालक सतीश वाघमोडे (वय 25 रा. माळशिरस, जि. सोलापूर) हा किरकोळ जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच निपाणी शहर ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हडकर, हवालदार एस. एस. चिकोडे, बसवराज नावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महामार्गावरील वरचेवर होणारे अपघात ही चिंतेची बाब बनली आहे.

Related posts: